गोव्याच्या नामांकित रेस्टॉरंट मालकावर बलात्काराचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

कळंगुट येथील बीचवर असलेल्या एका नामांकित रेस्टॉरंटच्या मालकाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिल्ली पोलिस स्थानकात दाखल केली आहे.

कळंगुट : कळंगुट येथील बीचवर असलेल्या एका नामांकित रेस्टॉरंटच्या मालकाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिल्ली पोलिस स्थानकात दाखल केली आहे. सदर महिला ही दिल्लीची रहिवासी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची टीम काही दिवसांपूर्वी गोव्यात आली होती, परंतु ते याप्रकरणी कोणालाही अटक न करताच परत गेल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली आहे. सदर घटना ही 2009 मध्ये घडली असल्याची माहिती मिळाली आहे. 

गोवा नगरपालिका निवडणूक 20 मार्चला; आजपासून आचारसंहिता लागू

सदर दिल्लीची महिला हिची कळंगुट बीचलगत स्थावर मालमत्ता आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीचे रेस्टॉरंट हे या मालमत्तेशेजारी आहे. नोव्हेंबरमध्ये आरोपीच्या लोकप्रिय रेस्टॉरंटच्या काही भागाचे अज्ञात व्यक्तींकडून नुकसान कऱण्यात आले होते. त्यानंतर, या रेस्टॉरंट मालकाने तक्रार दाखल केलेल्या महिलेची तक्रार केली होती. 

जीएसटी नुसान भरपाईसाठी गोव्याला केंद्राकडून 20 कोटींचा निधी

संबंधित बातम्या