Covid-19 Goa: ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ केपेत दाखल...

chandrakant kavlekar.jpg
chandrakant kavlekar.jpg

केपे: उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Kavlekar) यांच्या हस्ते केपेमध्ये (Quepem) ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ (Oxygen on Wheels) कार्यान्वित करण्यात आली आहे. अत्याधुनिक कोविड रूग्णवाहिकेत पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, सोबत 2 जनरेटर आणि अत्यावश्यक औषधे उपलब्ध असतात. केपे आणि आसपासच्या तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या जनतेसाठी कोविड काळात हे वाहन वरदान ठरणार आहे. (‘Oxygen on Wheels’ service launched in Quepem, Goa)

मुंबईहून खास मागविलेल्या या वाहनाच्या उद्‍घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या सोबत, केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, अमोल काणेकर, प्रसाद फळदेसाई, केपे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. लोर्ना फर्नांडिस, केपे कोविड स्टेप उपकेंद्राचे डॉ. संतोष वेर्णेकर, डॉ. पूजा वस्त उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले, हल्लीच झालेल्या ‘तौक्ते’ वादळामुळे केपे भागात बरीच पडझड झाली होती. रात्रंदिवस वीजखात्याचे कर्मचारी आणि स्थानिक जनतेने मिळून पुरवठा परत सुरळीत करण्यात मोठा वाटा उचलला होता. वीज गायब झाल्याने कोविड रुग्णांना ऑक्सिजन देणे किंवा रुग्णापर्यंत ऑक्सिजन पोचविणे कठीण होऊन जाते. हे लक्षात आल्यानंतर तातडीने मुंबईहून हे खास तयार केलेले वाहन केपेत मागविले.

केपे तालुक्यांबरोबरच, शेजारील सांगे, धारबांदोडा, काणकोण आणि सालसेत तालुक्यातील कोविड रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. कुठल्याच ग्रामीण भागातील कोविड रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता होऊ नये, वीज नसल्याने त्याला ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, असे होऊ नये म्हणून हे वाहन आणले आहे. त्याच बरोबर या वाहनात तत्काळ लागणारी औषधे असणार आहेत. आपण या वाहनासाठी आणि आरोग्य केंद्रावर लागणाऱ्या कोविड औषधांचा मुबलकसाठा यापूर्वीच आरोग्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. 

केपे येथील कोविड स्टेप उपकेंद्र हे केपे आणि आजूबाजूच्या जनतेसाठी एक वरदान ठरत असून योग्य वेळी खाटा उपलब्ध होत असून प्राणवायूची सोय असल्याने रुग्णांना योग्य मदत मिळत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या जेवणाची तसेच प्राणवायूची, मोफत औषधांची तसेच इतर साधन सुविधांची सोय केल्याने रुग्णांना कोविडवर मात करण्यात सोपे जाते, असे  केपेच्या  नगराध्यक्ष सूचिता शिरवईकर यांनी काढले.                              

24 तास कॉल सेंटर
केपेत 7 मेला कोविड स्टेपअप केंद्र चालू झाल्यानंतर श्री. कवळेकर यांनी 24 तास कोविड रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. केपे सोबत काणकोण, सासष्टी, सांगे आणि धारबांदोडा भागातील कोविड रुग्णांसाठी आरोग्य केंद्रात नेऊन आणण्यासाठी किंवा घरून आरोग्य केंद्रात जाण्यासाठी ही 24 तास मोफत वाहनांची उपमुख्यमंत्र्यांनी सोय केली आहे. केपे आणि आजूबाजूच्या तालुक्यातील कोविड रुग्णांची यामुळे मोठी सोय झाली आहे. (Goa)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com