Goa Assembly election: पी. चिंतबरम पुन्हा एकदा गोव्यात दाखल

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर हालचाली गतीमान झाल्या असून कॉंग्रेसचे गोवा मुख्य निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रिय गृहमंत्री पी चिदंबरम गोव्यात आज दाखल झाले आहेत.
Goa Assembly election
Goa Assembly electionDainik Gomantak

पणजी - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर हालचाली गतीमान झाल्या असून कॉंग्रेसचे गोवा मुख्य निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रिय गृहमंत्री पी चिदंबरम गोव्यात आज दाखल झाले आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे परवा ता.२० रोजी गोव्यात दाखल होत आहेत. त्यामुळे येता आठवडा राजकीय खलबती व घटनांनी गाजणार आहे.

Goa Assembly election
Goa: 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

चिदंबरम हे आज दुपारी गोव्यात दाखल होताच कॉंग्रेसच्या ज्या गट समित्या स्थापन केलेल्या नाहीत त्या स्थापन करण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा सुरु केली. मात्र यापुर्वी ज्या गट समित्यांचे अध्यक्ष नियुक्त केले गेले होते ते स्थानिक नेत्यांना किवा सक्रिय कार्यकर्त्याना विश्‍वासात न घेता केल्याचे आरोप काही पदाधिकाऱ्यनी केल्यामुळे नाराज पदाधकाऱ्यांना शांत करतानाच उर्वरीत गट अध्यक्ष नियुक्त करण्याचे काम चिदंबरम यांना करावे लागणार आहे.

मागील भेटीवेळी चिदंबरम यांनी आपण पुढीलवेळी सात ते आठ दिवसासाठी गोव्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे यावेळी चिदंबरम हे सात ते आठ दिवस गोव्यात तळ ठोकून बसण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यातील कॉंग्रेसच्या एकूण कामाचा तथा कारभाराचा योग्य तो परिचय त्यांना होऊ शकतो जेणेकरुन उमेदवारी ठरवताना त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com