गरज पडल्‍यास 40 ही जागा लढवू: चिदंबरम

गोव्यात समविचारी पक्षांबरोबर युती करायची की नाही याबाबतचा निर्णय कॉग्रेसने अजून घेतलेला नाही
गरज पडल्‍यास 40 ही जागा लढवू: चिदंबरम
P. Chidambaram in goaDainik Gomantak

सासष्टी: गोव्यात (Goa) समविचारी पक्षांबरोबर युती करायची की नाही याबाबतचा निर्णय पक्षाने अजून घेतलेला नाही. गरज पडल्यास आम्ही 40 ही जागा लढवू, असे गोवा काँग्रेसचे (Congress) मुख्य निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी स्‍पष्‍ट केले. बाणावली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते.

राज्‍याच्‍या विविध भागांत जाऊन चिदंबरम काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. आज ते बाणावलीत होते. या मेळाव्यात काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाने युती करावी तर काहींनी युती करू नये असा सूर आळवल्‍याने संभ्रम निर्माण झाला असता युतीबाबत अजून निर्णय झालेला नाही.

गरज भासल्यास राज्यातील सर्व मतदारसंघांत काँगेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार, असे चिदंबरम म्‍हणाले. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेसचे कार्यकरी अध्यक्ष तथा माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी आमदार मिकी पाशेको, गोवा प्रदेश काँग्रेसचे जाहीरनामा समितीचे सहसमन्‍वयक एल्विस गोम्स, दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष ज्‍यो डायस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

P. Chidambaram in goa
Goa: भाजप सरकारकडून 'आप' मॉडेलची नक्कल

उमेदवार निवडीवेळी जनतेचा कौल घेणार

भविष्यात काँग्रेस पक्षातून आमदार फुटू नयेत यासाठी आगामी निवडणुकीवेळी उमेदवार निवडण्याची तसेच प्रचार व अन्य सर्व बाबतीत जनतेचा कौल घेण्यात येणार आहे. धर्मनिरपेक्षता काँग्रेस पक्षाचा आत्मा असून ती टिकवून ठेवण्यासाठी पक्ष सर्व प्रकारे लढा देत आहे आणि अखेरच्‍या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. या धर्मनिरपेक्ष विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी जनतेने काँगेसला निवडून आणणे गरजेचे आहे, असे चिदंबरम म्‍हणाले.

काँग्रस उमेदवाराला निवडूण आणा : सार्दिन

बाणावलीच्या स्थानिक आमदारांनी सतत भाजपला पाठिंबा देऊन काँग्रेसविरोधात काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला बाणावलीवासीयांना १३ हजार मते दिली होती. ही मते आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला देऊन त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केले.

P. Chidambaram in goa
Goa: कॉंग्रेस उमेदवारीसाठी आत्तापासूनच संघर्ष सुरु...

‘आप’कडून गोवेकरांना फक्त आमिषे

गोव्यातील जनतेला नोकऱ्या, बेरोजगार तरुणांना पाच हजार रुपये, मोफत वीज देण्‍याची आमिषे आम आदमी पक्षाकडून गोमंतकीयांना दाखविली जात आहेत. केजरीवाल यांना गोव्यातील बेरोजगारांना पाच हजार रुपये देणे शक्य आहे तर त्यांनी दिल्लीतील बेरोजगार तरुणांना ते का दिले नाहीत, असा सवाल दिनेश गुंडू राव यांनी उपस्थित केला. आगामी निवडणूक केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस पक्ष प्रत्येक गोमंतकीयांपर्यत पोचविण्यासाठी काम करणार असून गोव्‍यात जिंकल्यास संपूर्ण भारतात निवडणुका जिंकण्यास शक्य होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com