Goa News : अजित केरकर यांना पी. दयानंद पै विश्व कोकणी रंगश्रेष्ठ पुरस्कार जाहीर

कोकणी साहित्य अनुवादाबद्दल विद्या पै यांना पुरस्कार
Ajit Kerkar And Vidya Pai
Ajit Kerkar And Vidya PaiDainik Gomantak

Goa News : विश्व कोकणी रंगश्रेष्ठ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुप्रसिध्द अभिनेते अजित केरकर यांना कोकणी नाटकातील दीर्घकालीन योगदानासाठी प्रतिष्ठेचा मंगळूरच्या विश्व कोकणी केंद्राचा डॉ. पी. दयानंद पै विश्व कोकणी रंगश्रेष्ठ पुरस्कार-2022घोषित झाला आहे.

एक लाख रुपये व मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार त्यांना ९ फेब्रुवारी येथे मंगळुरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

Ajit Kerkar And Vidya Pai
मंदिर पुनर्बांधणी समिती : RSS च्या माजी पदाधिकाऱ्यांनं सावंत सरकारला फटकारलं, म्हणाले..

अजित केरकर यांनी कोकणी रंगमंचासाठी रंगसंपन्न प्रतिभा व सृजन उन्मेष यांद्वारे मागील पाच दशके बहुमूल्य योगदान दिले आहे. अनेक बक्षिसे त्यांनी स्पर्धेत प्राप्त केली आहेत. नेपथ्य व दिग्दर्शनातही प्रावीण्य मिळवले आहे.

त्यांनी सतत चारदा प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवण्याचा विक्रम करताना एकंदर सातदा अभिनयाचे प्रथम बक्षीस प्राप्त केले आहे. दोरेमिफा, तुळाभार, एवम इंद्रजीत, चैतन्याक मठ ना, पिपळ पेटला व इतर अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका यादगार ठरल्या आहेत.

Ajit Kerkar And Vidya Pai
आईने मुलीला घरी सोडायला सांगितले अन् घात झाला, नातेवाईकाने केला बलात्कार

दरम्यान, कोकणी साहित्याचा इंग्रजीत अनुवाद केल्याबद्दल विद्या पै यांना डॉ. पी. दयानंद पै विश्व कोकणी अनुवाद पुरस्कार- २०२२ घोषित झाला आहे.

विद्या पै यांनी अनेक कोकणी कथा व कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. पुरस्काराचे परीक्षक म्हणून पय्यनूर रमेश पै, गोकुळदास प्रभू, डॉ. किरण बुडकुले आणि मेलवीन रॉड्रिग्स यांनी काम पाहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com