सासष्टी तालुक्यात पावसामुळे ३३ हेक्टर भातशेतीचे नुकसान

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

गोव्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे सासष्टी तालुक्यातील सुमारे ३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त मायणा कुडतरीमध्ये १८ ते २० हेक्टरवरील कापणीला आलेल्या पिकांची हानी झाली आहे. 

सासष्टी: गोव्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे सासष्टी तालुक्यातील सुमारे ३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त मायणा कुडतरीमध्ये १८ ते २० हेक्टरवरील कापणीला आलेल्या पिकांची हानी झाली आहे. 

आर्थिक संकटात पडलेल्या सासष्टीतील शेतकऱ्यांनी शेतकरी आधार निधी योजनेच्या स्वरुपात आर्थिक मदत मिळवी, यासाठी सासष्टीतील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केले आहे. 

अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी सासष्टी कृषी विभागीय अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यास सुरू केलेले आहेत. पण, ही नुकसान भरपाई त्वरित वितरित करण्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  

अतिवृष्टीमुळे सासष्टीत तालुक्यात कापणीला आलेल्या ३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सासष्टी तालुक्यात काही ठिकाणी भातशेती अद्याप न पिकल्यामुळे मुसळधार पावसाचा या भातशेतीला जास्त फटका बसला नाही पण, कापणीला आलेला भात मुसळधार पावसामुळे खाली पडल्याने सासष्टीत ३३ हेक्टर भातशेती पिकांची नुकसानी झाल्याचे केलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सासष्टी कृषी विभागीय अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेल्या आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्यात येत असून सासष्टीतील मायणा कुडतरी भागात २० तर नागोवा आणि वेर्णा भागात सुमारे १० हेक्टर भातशेती पिकाची नुकसानी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता. परंतु आता मध्येच पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. भात अद्याप कापणीलाही न आल्याने शेतात पाणी साचून भाताची नासाडी झाली आहे. 

शेती करण्यासाठी प्रत्येक शेतकरी दिवसरात्र एक करीत असून पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट व खर्च केलेला पैसा वाया होतील. त्यामुळे अशा परिस्थितीत कृषी विभागाने आर्थिकरित्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत पुरविणे गरजेचे आहे, असे शेतकरी इनासिओ फर्नांडिस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या