भातशेतीच्या नुकसानीचा कृषी खाते घेणार आढावा

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

मुसळधार पावसामुळे राज्यातील भातशेतीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा आता कृषी खाते घेणार आहे, अशी माहिती कृषी खात्याकडून मिळाली.

पणजी: मुसळधार पावसामुळे राज्यातील भातशेतीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा आता कृषी खाते घेणार आहे, अशी माहिती कृषी खात्याकडून मिळाली.

सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यात पावसाचा जोर चांगलाच आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम तर लांबणीवर पडण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत. भात शेतीच्या बाबतची स्थिती पावसामुळे अधिक गंभीर झाली आहे. ज्या ठिकाणी भाताची लागवड उशिरा करण्यात आली आहे. तेथे नुकसानाचा अधिक धोका नसल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या शेतीचे झालेले नुकसान आता कृषी खाते पाहणार आहे.

कृषी खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी खात्याकडून बियाणे पेरणीसाठी घेतली आहेत. खात्याकडून वांगी, मुळा, पालक, वाल यासारख्या भाज्यांची पिके स्थानिक शेतकऱ्यांनी घ्यावीत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. भाजीपाल्याला बाजारपेठ देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फलोत्पादन महामंडळ कार्यरत राहणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी खरीप हंगामात २४ हजार हेक्टर जमिनीत भातपिकाची लागवड करण्यात आली होती. राज्यातील पडीक जमिनी अधिकाधिक प्रमाणात शेतीसाठी वापरल्या जाव्यात म्हणून जनजागृती करण्याचे कार्यही कृषी खाते करणार आहे. 

संबंधित बातम्या