काणकोण तालुक्यातील भरड भातशेती धोक्यात

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

काणकोणमधील भरड भात शेती काणकोण मधील भरड भात शेती पावसाने ओढ दिल्याने धोक्यात येण्याची शक्यता आहे.

काणकोण: काणकोणमधील भरड भात शेती काणकोण मधील भरड भात शेती पावसाने ओढ दिल्याने धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे मिरची शेतीही पावसाअभावी करपण्याची शक्यता आहे.यंदा चतुर्थी नंतर आताच धोडकी,भेंडी,काकडी व चिबूड यांची उपज होऊ लागली आहे.पावसाचा कोरडा काळ असाच सुरू राहिल्यास वेली सुकण्याची भिती निर्माण झाली आहे.गेल्या आठवड्यापासून मिरची रोपट्याना मिरची धरू लागली होती मात्र पावसाने दडी मारल्याने त्याचाही परिणाम मिरची पिकावर होणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने  व कडक उन्हाच्या माऱ्यामुळे  भातशेतीवर व भाजी पिकावर पतंगानी(केटर पिलर) हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.ज्या शेतकऱ्यानी जून- जुलैमध्ये पेरणी पूर्ण केली होती त्याची शेती तरारून आली आहे.मात्र ज्या शेतकऱ्यानी जुलै महिन्याच्या शेवटच्या काळात पेरणी केली होती त्यांची भातशेती पावसाने ओढ दिल्याने धोक्यात येण्याची शक्यता आहे.भरड शेतीवर पावसाच्या या विश्रांतीचा परिणाम होणार आहे मात्र अधुनमधून पावसाच्या सरी होत राहिल्यास;  हा धोका टळणार आहे.सद्या भात शेतीत दाणे भरू लागले आहेत असे काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर यांनी सांगितले. गावडोंगरी,खोला व खोतीगाव तसेच श्रीस्ळ पंचायत क्षेत्रात भरड भात शेती आहे.काणकोणात २५२०हेक्टर जमिन खरीप भातशेतीच्या लागवडीखाली आहे.३१४ हेक्टर जमीन खरीप हंंगामात भाजी लागववडीखाली आहे असे सहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सवर्णकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या