Goa News : मातीचे संवर्धन करा, पुढील पिढी सक्षम घडेल

पद्मश्री’ राहीबाई सोमा पोपेरे : नेवरा पंचायत सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
Nevara Panchayat
Nevara PanchayatGomantak Digital Team

शेतीसाठी रासायनिक खते आणि संकरित पद्धतीचा वापर होत असून, लोकांमध्ये आजार वाढले आहेत. त्यासाठी मातीचे आरोग्य राखले पाहिजे. पुढील पिढी सक्षम करायची असेल तर मातीचे संवर्धन गरजे आहे. माती चांगली तर अन्न चांगले आणि अन्न चांगले म्हणजे माणूस चांगला, असे मत पद्मश्री बीज माता राहीबाई सोमा पोपेरे यांनी व्यक्त केले.

पूर्वी एवढे आजार नव्हते, आज आजार वाढले आहेत. याचे मुख्य कारण खाण्यात झालेले बदल. अगोदर लोक रानभाज्या खात होते. त्यामध्ये औषधी वनस्पती गुण असतात. दहा भाज्या नाही, तर दोन भाज्या आहारात असाव्यात; परंतु त्या चांगल्या गुणवत्तेच्या. त्यासाठी शेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे, अशी सूचना पद्मश्री बीज माता पोपेरे यांनी केली. नेवरा पंचायत सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या कार्यक्रमात त्या मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या.

Nevara Panchayat
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

यावेळी पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, आमदार वीरेश बोरकर, गोवा प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, तज्ज्ञ सदस्य गोवा जैवविविधता मंडळ राजेंद्र केरकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, कृषी खात्याचे उपसंचालक जोशी आणि नेवराच्या सरपंच सुनिता नाईक उपस्थित होत्या.

Nevara Panchayat
Aditya Singh Rajput Passes Away : सीआयडी फेम या अभिनेत्याचा मृत्यू.... मृतदेह सापडला बाथरुममध्ये...

बियाणांची बँक संकल्पना

  • पोपरे म्‍हणाल्‍या, माझे शिक्षण निसर्गाच्या शाळेत झाले. बालपणी वडिलांसोबत शेतात जात होते. त्यांच्याकडूनच शेतीचे शिक्षण मिळाले.

  • १२व्‍या वर्षी लग्न झाले तेव्हा संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्यानंतर पुढील २५ वर्षे गायीच्या गोठ्यात गेली. समाजासाठी काही चांगले करण्याची इच्छा होती.

  • त्यानंतर महिलांना रोपे देण्यास सुरुवात केली. महिला बचतगटांच्या संपर्कात झाले. नंतरच्या काळात काम सुरू ठेवले. बियाणी बँकेची कल्पना सुरू झाली. आज माझ्या घरात दिवाळीला रांगोळी बियाण्यांची घातली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com