मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत याच्या सोबत मये गावात पारंपारीक पध्दतीत पाडवा साजरा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मये येथील गोमंतक गो शाळेत पाडव्या निमित्त मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आपल्या पत्नी  सुलक्षणा सावंतसह गायीची पुजा केली.

 सिकेरी: मये येथील गोमंतक गो शाळेत पाडव्या निमित्त मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आपल्या पत्नी  सुलक्षणा सावंतसह गायीची पुजा केली. ह्यावेळी सोबत सरपंच तुळशीदास चोडणकर,कमलाकांत तारी.कमलेश बांदेकर व ईतर मान्यवर उपस्थित होते. 

मये गावात दरवर्षी  पारंपारीक पध्दतीत पांडवा साजरा केला जातो. गुरांची पुजा केल्यानंतर गोठ्यामध्ये शेणाचा गोठा तयार केला जातो व मये गावातील वाड्यावाड्यात जाउन  तेथिल युवक विविध प्रकारचे खाद्य प्रदार्थ माळरानात गोळा होतात. व पदार्थ घेउन  सगळे मिळून खातात.  मौजमजा करत पाडव्याचा सण साजरा करतात.

संबंधित बातम्या