केरी सत्तरीत गांधीगीरी, धोकादायक ठरत असलेले गतिरोधक रंगवले
केरी सत्तरी (Satari) येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर)Dainik Gomantak

केरी सत्तरीत गांधीगीरी, धोकादायक ठरत असलेले गतिरोधक रंगवले

Satari येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धोकादायक बनत चाललेले गतिरोधक (Speed breaker) रंगावण्याचे काम करीत गांधीगिरीचा प्रत्यय आणून दिला आहे.

पर्ये : महात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) निधनाला 73 वर्षे झाली तरी पण गांधी विचार आजही लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात भिनलेला दिसतो. जरी गांधी शरीराने नसला तरी विचाराने अजूनही जिवंत दिसत आहे. समाजात कोणताही बदल घडवायचा असेल तर तो पूर्वी बदल स्वतः मध्ये बदलायला हवा किंवा एखाद्या समस्येकडे सरकारचे (Government) लक्ष वेधयाचे ते काम स्वतः आपण पूर्वी करावे, असे गांधी विचार सांगतात. याचीच प्रचिती आज केरी सत्तरी येथे आली. येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धोकादायक बनत चाललेले गतिरोधक (Speed breaker) रंगावण्याचे काम करीत गांधीगिरीचा प्रत्यय आणून दिला आहे.

केरी सत्तरी (Satari) येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर)
सरकारी कर्मचाऱ्यांकडून 'एक कदम स्वच्छता की और' अभियानचा संकल्प
केरी सत्तरी Satari येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर)
केरी सत्तरी Satari येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर)Dainik Gomantak

केरी सत्तरीतील चोर्ला घाटाचा मुख्य रस्ता हा तसा गजबजलेला आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ येथे असते. मात्र या रस्त्यावरील खड्डयांनी वाहन चालकांना हैराण बनवले आहेच. त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक गतिरोधक आहे. रस्त्यावर जर गतिरोधक असल्यास, ते दर्शवणारी रस्त्याबाजूला गतिरोधक चिन्हे असायला हवी आणि गतिरोधकावर पांढरे पट्टे असायला हवे. पण येथील गतिरोधकावर असे पांढरे पट्टे नसल्याने हे गतिरोधक धोकादायक बनले होते येथे अपघातही होत होते. गेल्या दोन दिवसात येथे या गतिरोधकांचा अंदाज न आल्याने दोन अपघात झाले असाच एक अपघात आज सकाळी केरीतील एका गतिरोधक वर झाला. सुदैवाने या अपघातात त्यांना मोठी इजा झाली नाही.

केरी सत्तरी (Satari) येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर)
नोकऱ्यांसाठी कुणीही पैसे घेत नाही घेतल्यास तक्रार करावी; CM सावंत

हे गतिरोधक भर वस्तीत असल्याने हे अपघात बऱ्याच लोकांनी पाहिले होते आणि त्या गतिरोधकांचा धोका त्यांच्या लक्षात आला. या मार्गावर आणखी अशा घटना घडू नये म्हणून त्यांनी चक्क गतिरोधक रंगवण्याचे काम हाती घेतले.

पेशाने शिक्षक असलेले चंद्रशेखर गावस यांनी ही गतिरोधक रंगवण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारोडकर यांच्याकडे व्यक्त केली आणि गतिरोधक रंगवण्याचे ठरविले. त्यानंतर रंग व ब्रश घेऊन गतिरोधक रंगवायला सुरुवात केली. त्यांना वचन केरकर, नामदेव गावस, पांडुरंग गावस, नुरुद्दीन करोल, विठोबा गावडे, संकल्प पारोडकर आदींनी साथ दिली. त्यांच्याकडून केरी-चोर्ला मार्गावरील 5 गतिरोधक रंगवले आहे.

दरम्यान त्यांच्या या कार्याने सरकारी यंत्रणेला जाग येईल खरी पण त्यांची ही गांधीगिरी बऱ्याच जणांना भावली आणि आज गांधी जयंती निमित्त चर्चेचा विषय बनली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com