Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोव्यात येणार; 'या' तारखेला SCO ची बैठक

12 वर्षानंतर पाकिस्तानचा मंत्री भारतात येणार, मोदींवर टीका करून चर्चेत आले होते भुट्टो
Bilawal Bhutto
Bilawal BhuttoDainik Gomantak

Bilawal Bhutto: गेल्या काही काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे गोव्यात येणार आहेत.

गोव्यात 4 आणि 5 मे रोजी शांघार्य सहकार्य संघटनेची (SCO) बैठक होणार आहे. या बैठकीत भाग घेण्यासाठी भुट्टो भारतात येणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. ही बैठक गोव्यात होणार आहेत.

या बैठकीत पाकिस्तानचे शिष्टमंडळ सहभागी होईल. यात परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचाही समावेश असणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व भुट्टो करणार आहेत.

दरम्यान, यानिमित्ताने 12 वर्षानंतर पाकिस्तानचे मंत्री भारतात येणार आहेत. यापुर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार 2011 मध्ये भारतात आल्या होत्या. तर 2014 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित होते. तेव्हापासून कुणीही पाकिस्तानी नेता भारत दौऱ्यावर आलेला नाही.

Bilawal Bhutto
Goa Tourist: गोव्यात गेल्या 6 महिन्यात आले 'इतके' लाख परदेशी पर्यटक; एकूण 341 चार्टर विमाने दाखल

भारताने पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांना SCO च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले होते. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश SCO चे पूर्ण सदस्य आहेत. 

SCO संघटनेत आठ सदस्य आहेत. या संघटनेचे अध्ययक्षपद भारताकडे आहे. या देशांमध्ये भारत, रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. 

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि प्रत्युत्तरात भारताने केलेला बालाकोट येथील एअरस्ट्राईक यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावाचे आहेत.

Bilawal Bhutto
धक्कादायक! हिंदु विद्यार्थिनीवर फेकले बीफ; ब्रिटनच्या शाळांमधील हिंदु विद्यार्थ्यांच्या द्वेषाच्या अनेक घटना उघड

दरम्यान, डिसेंबरमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल-भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला होता. त्याचे मोठे पडसाद भारतात उमटले होते. त्यानंतरही या वक्तव्याची भुट्टो यांनी पाठराखण केली होती.

बिलावल भुट्टो म्हणाले होते की, मी मोदींवर जी टिप्पणी केली, ते शब्द माझे नसून भारतीय मुस्लिमांचे होते. भारतातील मुस्लिम जे बोलतात तेच मी बोललो. मी भारतीय पंतप्रधान मोदींबद्दल जे बोललो ते ऐतिहासिक वास्तव आहे, मी त्याच गोष्टीबद्दल बोलत होतो.

मी केलेल्या टिप्पण्या माझ्या नाहीत. ते शब्द माझे नव्हते, मी मोदींसाठी 'गुजरातचा कसाई' हा शब्द शोधला नव्हता. गुजरात दंगलीनंतर भारतात फक्त मुस्लिमांनी मोदींसाठी हा शब्द वापरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com