Marathi Film Festival 2022: 13 वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव उत्साहात

कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान
Marathi Film Festival 2022
Marathi Film Festival 2022Dainik Gomantak

कोविड निर्बंधामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेला मराठी चित्रपट महोत्सव यंदा पणजी येथे पार पडला. 13 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तो वितरित करण्यात आला.

(Panaji 13 th Marathi Film Festival 2022 )

Marathi Film Festival 2022
Independence Day 2022: 'या' हिंदी चित्रपटांतील डायलॉग तुम्हाला करतील रोमांचित

प्रकृती स्वास्थ्यामूळे अभिनेते अशोक सराफ या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी उपस्थित राहात हा पुरस्कार स्विकारला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तो वितरीत करण्यात आला.

Marathi Film Festival 2022
हृतिक रोशनचा 'Fighter' मोड ऑन; बनवली जबरदस्त बॉडी
13th Marathi Film Festival
13th Marathi Film Festival Dainik Gomantak

पुरस्कार स्विकारताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, हा पुरस्कार अभिनयासाठी चांगल्या सहकाऱ्यांची जोड मिळाल्यामूळेच तो मिळू शकला. प्रकृती स्वास्थ्यामूळे आज अशोक सराफ या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत. मात्र त्यांच्याच तोंडचे हे शब्द आहेत. अशोक सराफ यांच्या अभिनयावर अफाट प्रेम करणाऱ्या रसिकांचे ही आभार यावेळी मानण्यास त्या विसरल्या नाहीत.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोमंतकीय जरी कोकणी बोलत असले तरी त्यांच प्रेम मराठी चित्रपटावरील कधीच कमी झालेलं नाही. गोवेकर मराठी चित्रपट आणि कार्यक्रम आज ही अगदी आवडीने पाहतात त्यामूळे मराठी सिनेसृष्टी आणि गोमतकीयांचं एक अतुट नातं आहे.

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री निना कुळकर्णी, अभिनेते विराज कुलकर्णी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणिअभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी, ज्येष्ट अभिनेते डॉ. मोहन आगाशे उमेश कामत, अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्यासह अनेक मराठी सिनेकलाकारांनी हजेरी लावत या कार्यक्रमाची उंची वाढवली. तसेच गोमंतकियांनी ही या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com