पणजी डॉक्टरांचा इशारा; तर..  कोरोनाबाधितांची सेवा खंडित करू

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारी दादागिरी व शिव्या यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारी दादागिरी व शिव्या यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. (Panaji doctor's warning; So .. let's interrupt the service of the corona victims) 

गोवा: दिवसभरात नवे 3 हजार 19 कोरोनाबाधित 36 रुग्णांचा मृत्यू

याबाबत निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतिक सावंत यांनी काढलेल्या पत्रकात सांगितले की, १८ एप्रिल रोजी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एका कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्व डॉक्टरांना व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २८ रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात असाच प्रकार घडला. कोरोनाबाधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी गदारोळ केला व डॉक्टरांना मारहाण करण्याची धमकी देत शिव्याशाप दिले. त्याचबरोबर एक व्‍हेंटिलेटरही तोडला. निवासी डॉक्टर हे गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारच्या विनंतीनुसार कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. अपुऱ्या साधनसुविधा असूनही जिवाची पर्वा न करता सुमारे तीनशे डॉक्टर कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कोणी मुद्दामपणा करून लागला तर योग्‍य नव्‍हे.
 

संबंधित बातम्या