Panaji G20 Summit : जी-२०’च्या पार्श्वभूमीवर राजधानी सजतेय

इमारतींना रंगरंगोटी : बसस्थानकासमोर आकर्षक बेटाची उभारणी
G20 Meet in Goa
G20 Meet in GoaDainik Gomantak

G20 Summit 2023 Panaji, Goa: राज्यात होणाऱ्या ‘जी-२०‘च्या बैठकांच्या पार्श्‍वभूमीवर राजधानीला नवी झळाळी मिळणार आहे, हे स्पष्ट आहे. शहरातील सरकारी, तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इमारती, दुकानांच्या दर्शनी बाजूच्या भिंती व परिसराची रंगरंगोटी सुरू आहे.

त्याशिवाय कंदब बसस्थानकासमोरील जागेत (वाहन बाहेर पडतात) तेथे वाहतूक बेट तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.

G20 Meet in Goa
G20 Summit: आगामी G20 शिखर परिषदेसाठी दाबोळी विमानतळावर अधिकाऱ्यांनी केली पाहणी

कदंबा बसस्थानकासमोर वाहन बाहेर पडतात, त्याठिकाणी म्हणजे अटल सेतूच्या खालील बाजूस ध्वजाजवळ वाहतूक बेट तयार केले जात आहे.

‘जी-२०’चा हा उपक्रम असून, अनेक ठिकाणच्या पदपथांचे भाग्य उजळले आहे. भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर रस्ता दुभाजकाची नव्याने उभारणी केली जात आहे. ज्या इमारतीसमोरील पदपथावरील पेव्हर्स खराब झाले आहेत, ते बदलण्याचे कामही गतीने सुरू आहे.

G20 Meet in Goa
G20 Summit Goa: ‘जी 20’ मुळे राज्य पर्यटनास लाभ

याशिवाय संध्याकाळी १८ जून मार्गावर हॉटमिक्सचा थर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रविवार असूनही हे काम सुरू होते. काही ठिकाणी वाहतूक वळवली होती.

लष्कराच्या इमारतीचीही रंगरंगोटी

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयामसोरील पदपथाचे काम रविवारीही सुरू होते. त्याशिवाय लष्कराच्या इमारतीला रंगरंगोटी करण्याचेही काम सुरू होते. मांडवी किनारी असणाऱ्या पदपथावर नव्याने इंटरलॉकिंग पेव्हर्स बसविण्याचे काम सुरू होते.

पणजी जिमखान्यापासून कला अकादमीपर्यंतचा पदपथ खोदलेला आहे. त्याशिवाय या ठिकाणी उभारलेले आणि चालू नसलेले पथदीपही हटवून नव्या खांबांची तसेच पथदीपांची उभारणी करण्यात येत आहे. एकंदर राजधानीचे शहर जी-२० बैठकांच्या पार्श्वभूमीवर सजते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com