Rape Case News: गुजरातच्या ‘त्या’ हॉटेल मालकाविरुद्ध भक्कम पुरावे

Rape Case News: गोव्याचे पोलिस पथक लवकरच गांधीधामला रवाना होणार
Rape Case | Goa News
Rape Case | Goa News Dainik Gomantak

Rape Case News: मॉडेलचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीवरील बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातमधील हॉटेलमालकाविरुद्ध गोवा पोलिसांनी ठोस पुरावे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज महिला पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी कळंगुट येथील त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच त्या काळात तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

ठोस पुरावे जमा करून संशयिताला अटक करण्यासाठी गोवा पोलिस पथक लवकरच गांधीधामला जाणार आहे. ज्या हॉटेलमध्ये संशयित या पीडित तरुणीसोबत राहात होता, तेथील रजिस्टरची मागणी केली असता त्यांच्याकडे रजिस्टर नसल्याचे सांगण्यात आले.

युवतीला ढकलले देहविक्री व्यवसायात

संशयिताने पीडितेला कोणत्या हॉटेलमध्ये फळांच्या रस दिला, त्यामुळे ती बेशुद्ध पडली, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. सकाळी उठली, तेव्हा ती हॉटेलच्या खोलीत होती आणि तिच्या अंगावर कपडे नव्हते.

तिने विचारणा केली असता, तिचे काढलेले अश्‍लील व्हिडिओ संशयिताने दाखवले. गुजरातमध्येही संशयित तिला वारंवार हॉटेलवर बोलावून लैंगिक अत्याचार करत होता, तसेच तिचा देहविक्रीसाठी वापर करून संशयित पैसे कमावत होता.

धमकीला कंटाळून नोंदवली तक्रार

व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीला कंटाळून पीडितेने गुजरातमधील एका एनजीओची मदत घेतली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, गुन्हा गोव्यात घडल्याने एनजीओने तिला गोव्यात पाठवले होते. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गोव्यात घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. जानेवारी 2022 व मार्च 2022 मध्ये संशयिताने अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Rape Case | Goa News
Water Supply Issues : पेडणे, बार्देश तालुक्यांना होणार निर्बंधित पाणीपुरवठा; 'हे' आहे कारण

राजकीय पक्षाशी लागेबांधे :

संशयिताने तिला जुने गोवे येथे चर्च परिसरात त्याच्या गाडीतून नेले होते तो परिसरही तरुणीने ओळखला आहे. संशयित गोव्यात स्वतःची गाडी घेऊन आला होता. मात्र, तरुणीला विमानाने येण्यास सांगितले होते. त्याच्याविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा नोंद केला आहे. गुजरातमध्ये त्याचे हॉटेल आहे, तसेच त्याचे एका राजकीय पक्षाशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे जमा करूनच त्याच्या नाड्या आवळण्यात येतील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com