पणजीः येत्या महिन्याभरात गुंडांना तडीपार करणार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

गेल्या दीड दोन महिन्यांत गुन्हेगारीने काही भागात डोकेवर काढले असले, तरी गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. गोवा मुक्तीनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडीपार केले जाणार आहे.

पणजीः गेल्या दीड दोन महिन्यांत गुन्हेगारीने काही भागात डोकेवर काढले असले, तरी गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. गोवा मुक्तीनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडीपार केले जाणार आहे. त्याची कार्यवाही येत्या दीड महिन्यात होणार आहे.(Panaji: The hooligans will be expelled within the next month)

फोंडा आणि पर्वरीत रुग्णसंख्येने गाठला उच्चांक!

मंत्रालयात आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालणार नाही. गुंडगिरीचा समूळ बिमोड करणे, हे सरकारचे धोरण आहे. त्याचमुळे प्रथमच गुंडांना तडीपार करण्याची प्रक्रीया केली जात आहे. येत्या महिनाभरात गुंड तडीपार झालेले दिसणार आहेत. काहींना जिल्ह्यातून तर काहींना राज्यातूनच तडीपार करण्यात येणार आहे. गुन्हे काही ठिकाणी घडले आहेत याचा अर्थ कायदा व सुव्यवस्था ढासळली असा नाही. त्याप्रकरणातील संशयितांना गजाआड पोलिसांनी केलेले आहे. राज्यात आजही कायद्याचे राज्य आहे. कायदा कोणालाही हातात घेऊ दिला गेलेला नाही.

आता गोव्यात फिल्म शुटिंगसाठी घ्यावी लागणार परवानगी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, त्यांना मोकाट फिरू देऊ नका, अशी सूचना गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लोकांना भयमुक्त वातावरणात जगता आले पाहिजे. सायंकाळनंतरही कायद्याचेच राज्य सर्वत्र हवे याची दक्षता घ्‍यावी. गुन्हेगारांविरोधात कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा ठेऊ नका. कठोर कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
 

संबंधित बातम्या