पणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांचा 'दुकान बंद'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज सकाळी अचानकपणे बंद पुकारला आहे.

पणजी : पणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज सकाळी अचानकपणे बंद पुकारला आहे. महापालिकेने काल मार्केटमधील अतिक्रमणे हटवली होती. त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. भाजी फळे विकत घेण्यासाठी सकाळी मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांची यामुळे गैरसोय झाली आहे. महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरुच राहील असे स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आल्याने हा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे.

तर त्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना पत्र लिहावे

मेळावली IIT प्रकरणात सहकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

संबंधित बातम्या