पणजीच्या महापौरांनी मुख्यमंत्रांच्या निर्णयाला डावलले?

पणजीच्या महापौरांनी मुख्यमंत्रांच्या निर्णयाला डावलले?
panaji market

पणजी:  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी काल  जाहीर केल्यानुसार 15 दिवसांची कडक संचारबंदी उद्या ता. 9 मे पासून  लागू होणार आहे.  त्यासाठी अद्याप अधिसूचना काढलेली नाही. मात्र पणजी (Panaji) महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी आजच पणजी मनपा मार्केटला कुलूप ठोकले आहे.  त्यामुळे दुकानदारांसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (Panaji mayor overturns CM's decision?) 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी  9 मे ते 24  मे पर्यंत  कडक संचारबंदी अर्थात कर्फ्यूची घोषणा केली आहे. या काळात सकाळी 7 वा. ते दुपारी 1 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानें खुली राहणार असल्याने सामान पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. तथापि,  पणजीचे  युवा महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजी मार्केट व अन्य दुकानें  आजच पूर्णपणे बंद केली आहेत. त्यामुळे उद्यापासून सकाळी जीवनावश्यक  वस्तूची दुकाने कशी उघडायची ? या विवंचनेत येथील दुकानदार आहेत. अचानक झालेल्या या निर्णयाने पणजीवासिय आश्चर्यचकित झाले आहेत, त्यांचे म्हणणे आहे की गेल्या  काही दिवसांपासून त्यांना मासे, कोंबडी (Chicken Fish Market) किंवा भाज्या मिळाल्या नाहीत.

उद्यापासून कर्फ्यु (Curfew) लागल्यानंतरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळच्या सत्रात उघडी ठेवण्याची परवानगी असताना मार्केटमधील सरसकट सर्व दुकाने बंद करणे गैर आहे.  आज नियमितपणे बाजारात मासे आणि भाज्या खरेदीसाठी आलेल्यानी  या निर्णयाबद्दल महापौरांना फटकारले. महापौरांचा हा निर्णय बालिश असल्याची टीका त्यांनी केली आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वत: जीवनावश्यक वस्तू विक्री खुल्या असतील असे सांगितले तेव्हा महापौरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही. महापौरांनी असा निर्णय घेण्यापूर्वी आपली टीम, माजी महापौर किंवा किमान वडील बाबुश मोन्सेरात यांना विचारात घ्यायला हवे, असेही एका नागरिकाने सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com