कसिनोंकडून महापालिकेला मिळणार एवढा महसूल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

कसिनोंच्या व्यापार परवान्यांचे नूतनीकरण महापालिकेने अटीनुसार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कसिनोंचे साईनबोर्ड शुल्क व व्यापार परवान्यांच्या शुल्कवाढीला तत्त्वतः मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत ५२ लाखांचा महसूल घालणाऱ्या कसिनोंकडून त्यापेक्षा काही लाखांचा महसूल मिळण्याची वाट आता मोकळी झाली आहे. 

पणजी : कसिनोंच्या व्यापार परवान्यांचे नूतनीकरण महापालिकेने अटीनुसार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कसिनोंचे साईनबोर्ड शुल्क व व्यापार परवान्यांच्या शुल्कवाढीला तत्त्वतः मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत ५२ लाखांचा महसूल घालणाऱ्या कसिनोंकडून त्यापेक्षा काही लाखांचा महसूल मिळण्याची वाट आता मोकळी झाली आहे. 

महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी कसिनोच्या व्यापार परवान्यावर महापालिका सतत घेत असलेल्या यू टर्नविषयी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी त्यावर स्पष्टीकरण देताना महापौर उदय मडकईकर यांनी सरकार कसिनोंना मुदतवाढ देत आहे. तरी आम्ही कसिनोंकडून महसूल ५२ लाखांपर्यंत महापालिकेला मिळवून दिला आहे. दरम्यान, नगरसेवक मिनीन डिसोझा यांनी कसिनोंच्या मुद्द्यावर महापौर यांना प्रश्‍न केले. त्यावर उत्तर देत सध्या सुरू असलेल्या कसिनोंच्या मालमत्तेचे साईनबोर्डचे आकारामान तपासले जाईल. उद्या, गुरुवारपर्यंत प्रत्येक कसिनोंची माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर त्यांना वाढीव शुल्क आकारले जाईल.

संबंधित बातम्या