पणजी महानगरपालिका लागली कामाला...

मॉन्सूनपूर्व नियोजन: गटारे उपसण्याचे काम सुरू
पणजी महानगरपालिका लागली कामाला...
Panaji Municipal CorporationDainik Gomantak

पणजी: पणजी महानगर पालिकेने शहरातील गटारांची स्‍वच्‍छता आणि दुरुस्‍तीचे काम हाती घेतले आहे. शहरातील पावसाळापूर्व कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्‍याचे वृत्त आज ता. १ रोजी दै. गोमन्‍तकमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने साफसफाईचे काम हाती घेतले आहे.

महापालिकेचे अभियंता विवेक पार्सेकर यांनी सांगितले की, गटारांची स्‍वच्‍छता आणि झाडांच्‍या फांद्यांची छाटणी ही कामे वरचेवर केली जातात. पण पाऊस सुरू झाला की गटारे तुंबतात. यामुळे बऱ्याचदा गटारांतील पाणी रस्‍त्‍यावर येते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे पावसाळ्यापूर्वी लाद्या टाकून बंद केलेल्‍या मोठ्या गटारी पूर्णपणे स्‍वच्‍छ केल्‍या जातात. संपूर्ण वर्षभर यात साचलेला गाळ आणि माती काढून टाकली जाते. शहरात अशी मोठी गटारे अनेक आहेत. यामुळे काहीवेळा कामास विलंब होतो. पण सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील. सध्या मांडवी हॉटेलसमोरील मोठी गटारे स्‍वच्‍छ केली जात आहेत. तसेच सांतईनेज परिसरातील गटारांतील गाळ आणि माती काढली जात आहे.

Panaji Municipal Corporation
गोव्यातील रेती व्यवसायात चक्क पोलिस...

बाटल्‍या, प्लास्‍टिक टाकू नका : पार्सेकर

सध्या सर्वत्र प्‍लास्‍टिकचा बोलबाला आहे. स्‍थानिक नागरिकांसह पर्यटक स्‍वतःकडील प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या, पिशव्‍या आदी वस्‍तू गटरात फेकतात. मोठ्या गटरांची स्‍वछता करताना अशा वस्‍तू मोठ्या प्रमाणात सापडतात. नागरिकांच्‍या सेवेसाठी महानगरपालिका सदैव सज्ज आहे. पण नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्‍यक आहे. आपले शहर स्‍वच्‍छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्‍या सर्वांची आहे. यासाठी नागरिकांनी रस्‍त्‍यावर कोठेही किंवा गटारांमध्ये बाटल्‍या, प्‍लास्‍टिक टाकू नये, असे आवाहन पालिका अभियंता विवेक पार्सेकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.