पणजी महापालिकेची ‘ट्रेंडस’वर कारवाई

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

पणजी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पणजी येथील ‘ट्रेंडस’ या कपड्याच्या आस्थापनावर (शोरुमवर) कारवाई केली.

पणजी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पणजी येथील ‘ट्रेंडस’ या कपड्याच्या आस्थापनावर (शोरुमवर) कारवाई केली. पणजी येथील मच्छीमारी खात्याच्या कार्यालयासमोर भाऊसाहेब बांदोडकर रस्त्यालगत असलेल्या या तीन मजली इमारतीच्या वरच्या मजल्याचे बांधकाम बेकायदेशीर करण्यात आले होते. तीनही मजल्यावर  ब्रेंडेड कपड्याचा शोरुम थाटण्यात आला होता. पणजी महापलिकेने या अस्थापनाला नोटीस पाठवून वरचा मजला तोडण्याचे निर्देश दिले होते. (Panaji Municipal Corporation's action on 'Trends') 

सासष्टीकरांनो सावधान! कोरोनाची रुग्णांची संख्या ठरतेय चिंता वाढवणारी

मात्र सदर शोरुम मालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेने  वरचा मजला तोडण्यासाठी नोटीस काढली. सदर नोटिशीला शोरूम मालकाने उच्च न्यायालयात आव्हान दिले, मात्र उच्च न्यायालयाने ते फेटाळले.

गोवा: NDA तून का बाहेर पडलो? कारण सांगताना सरदेसाईंचे भाजपवर गंभीर आरोप

त्यानंतर या शोरुमच्या मालकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून महापालिकेच्या कारवाईला अटकाव करण्याची मागणी केली. मात्र तेथेही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे  ट्रेंडस शोरुमवर कारवाई करण्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या.

संबंधित बातम्या