पणजी पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थासह दोन आरोपी गजाआड

पणजी पोलिसांनी (Panajim police) आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण 1 लाख 10 हजार रुपयाचा अमली पदार्थ गांजा जप्त केला.
पणजी पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थासह दोन आरोपी गजाआड
Drugs Accused Dainik Gomantak

पणजी: पणजी पोलिसांनी (Panajim police) आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण 1 लाख 10 हजार रुपयाचा अमली पदार्थ गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक (Sudesh Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी पोलिसांच्या दोन पथकांनी दोन ठिकाणी छापा टाकला.

 Drugs Accused
Goa: माकडमारे आदिवासी जमात नागरीसुविधेपासून अजूनही वंचितच

यात गाझीपूर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील सुरेश कुमार (वय 28) व मिर्जापूर उत्तर प्रदेश येथील जितेंद्र सिंग (Jitendra Singh) (वय 22) या दोन तरुणांना अमली पदार्थ जवळ बाळगणे, त्याचा व्यावहार करणे, आदी कायदेभंग प्रकरणी अटक करण्यात आली व दोघांकडून अनुक्रमे 559.1 ग्राम व 605 ग्राम असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयाचा गांजा जप्त केला. पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब , संकेत पोखरे आदींनी या छाप्याच्या मोहिमेत भाग घेतला. दोन्ही आरोपीना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com