Library in Panaji: वाचकांची पावले वळताहेत वाचनालयांकडे

पुस्तकांद्वारे ‘अक्षय ज्ञान’ : कृष्णदास शामा वाचनालयास ३५ गटांची भेट
libraries
librariesGomantak Digital Team

Library in Panaji: वाचनसंस्कृतीत वाढ व्हावी यासाठी सरकारद्वारे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात अनुदानित वाचनालये चालविली जातात.

जिल्हा, तालुका, नगर स्तरावरदेखील वाचनालयांची स्थापना करण्यात आली आहे. लाखो पुस्तके संचित असलेले ‘अक्षय ज्ञान’ या पुस्तकांद्वारे मिळत आहे.

कोरोना काळात राज्यातील वाचनालये बंद होती. परंतु कोरोनानंतर पुन्हा अनेक चोखंदळ वाचकांची पावले वाचनालयांकडे वळत आहेत. कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयात महिन्याला सुमारे ९ हजार वाचक भेट देतात.

त्यापैकी ३ हजार वाचक हे घरी वाचण्यासाठी पुस्तके नेतात. फेब्रुवारी महिन्यात शाळा, महाविद्यालय, संशोधनांसाठी येणाऱ्या ३५ गटांनी वाचनालयाला भेट देत वाचनालयाच्या कार्यप्रणालीची माहिती करून घेतली.

१४५ वाचनालये

बिगर सरकारी संघटनांद्वारे राज्यात १४५ वाचनालये चालविली जातात. या वाचनालयांमध्ये फेब्रुवारी महिन्यात ५,५६५ वाचकांनी भेट दिली. सुमारे ३ हजार पुस्तके त्यांनी वाचली. अभ्यासासाठी पडताळणी केली तर घरी वाचण्यासाठी सुमारे १ हजार पुस्तके नेली जातात.

libraries
Book Reading: वाचण्यासाठी वाचावेच लागते...

राज्यात कोरोना महामारीनंतर वाचनालयाला भेट देणाऱ्या वाचकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक येत आहेत. ज्यांना वाचनाची आवड आहे ते सवड काढून वाचनालयाला भेट देतात.

सुलक्षा कोळमुळे, साहाय्यक राज्य ग्रंथपाल, कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालय, पणजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com