गोव्याच्या पोलिस अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम; मुलीचे लग्न लावले पुरोगामी पद्धतीने

Panaji senior police officer CL Patil arranged the marriage of his daughter in a progressive manner
Panaji senior police officer CL Patil arranged the marriage of his daughter in a progressive manner

पणजी: पणजी((Panaji) येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी(police officer) सी.एल.पाटील(C.L.Patil) हे नेहमीच आपल्या विविध कारणांनी चर्चेचा विषय बनलेले असतात. आताही त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह(Marriage) पुरोगामी पद्धतीने दोन दिवसांपूर्वी लावून देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.(Panaji senior police officer CL Patil arranged the marriage of his daughter in a progressive manner)

एकतर कोविडमुळे लग्न समारंभावर नियंत्रण आले आहे. तरीही राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक नियमावली धाब्यावर ठेवून बडेजाव करतानाचे प्रकार सर्वश्रृत आहेत. पण, एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आपल्या मुलीच्या लग्नाची कल्पना कुणालाही न  देता केवळ 38 व्हराडींच्या साक्षीने विवाह लाऊन देतो तेव्हा हा विषय चर्चेचा बनतो.

पोलिस अधिकारी सी.एल.पाटील यांची मुलगी रचना हिचा विवाह सोहन याच्याशी झाला. ते दोघेही अभियंता क्षेत्रातील आहेत. आवास्तव खर्चाला फाटा देत लग्न समारंभ पार पडला. यावेळी अक्षतामुळे होणारे तांदळांचे नुकसान टाळण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. आहेर-माहेरालादेखील यावेळी फाटा देण्यात आला. लग्नपत्रिका, भेटवस्तू, सजवलेला हॉल, बँडबाजा, अथवा डॉल्बी असे काहीच या लग्नप्रसंगी दिसून आले नाही.

सध्या गोव्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. लसीकरण हाच कोविड रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. कोविड काळातील संचारबंदी अंमलात आल्याने लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. गोव्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे सध्या कोविड रुग्ण सापडण्याचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण घटेल. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com