पणजी स्मार्ट सिटी: श्रीनेत कोठवाळे यांची केलेली बदली सरकारने स्थगित केली

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

दोनच दिवसांपूर्वी त्यांची इमेज इन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेड या सरकारी उपक्रमाचा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली होती.

पणजी: गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी गोवा सरकारने स्थापन केलेल्या इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेड या उपक्रमाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारीपदी वरिष्ठ सनदी अधिकारी श्रीनेत कोठवाळे यांची केलेली बदली सरकारने स्थगित केली आहे.

ते यापूर्वी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. त्या पदावरून दोन महिन्यांपूर्वी त्यांची तडकाफडकी सचिवालयाच्या कार्मिक खात्यात बदली करण्यात आली होती. त्यांना प्रशिक्षण व रजा राखीव या पदावर कार्यरत ठेवण्यात आले होते.

गोवा: आमदार राजीनामा प्रकरणी गिरीष चोडणकरांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

दोनच दिवसांपूर्वी त्यांची इमेज इन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेड या सरकारी उपक्रमाचा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली होती. त्यांनी या पदाचा अध्याप ताबा स्वीकारायचा होता. मात्र आज अचानक पणे त्यांची बदलीचा आदेश स्थगित करण्यात आल्याचा आदेश सरकारच्या कार्मिक खात्याने जारी केला आहे. यामुळे ते पुढील आदेशापर्यंत राजा व प्रशिक्षण राखीव या पदावर  कार्मिक खात्यात कार्यरत राहतील हे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या