Goa Agriculture : तरुणाईने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे - वरद सामंत

कृषीतज्ज्ञ : बांधकामांमुळे शेतजमीन होतेय कमी
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Goamnatk

राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेले काँक्रिटीकरण आणि बांधकामांमुळे शेतजमीन कमी होत आहे. त्यामुळे 2030 च्या अखेरीस तरुणाईला पूर्णवेळ व्यवसाय म्हणून शेती करावी लागण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. धारबांदोडा येथील कृषीतज्ज्ञ वरद सामंत यांनी याबाबत मत व्यक्त केले, की पूर्णवेळ शेती करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी राज्य सरकारने काही कृषी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवावे.

राज्यात शेतीला भरपूर वाव आहे आणि त्याची व्याप्ती लक्षात घेऊन 2030 पर्यंत तरूण पिढी शेती करण्यास वळू शकते. नुकतेच कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी ‘गोमन्तक’ला माहिती दिली होती की, कृषी विभाग शेतकरी आणि कृषी व्यवसायात असलेल्या लोकांना शेती व्यावसायिक पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना हरित व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे जे कृषी क्षेत्रासाठी ‘ग्रीन जॉब’ करतील.

Goa Agriculture
Panaji News : ताळगाव ते सांताक्रुझ रस्ता बनतोय धोकादायक

राज्यात ज्या वेगाने बांधकामे सुरू आहेत, ते पाहता आगामी काही वर्षांत आपल्याकडे शेतीसाठी पुरेशी जमीन नसेल. पुढील दहा वर्षांत आपल्या सर्वांना शेतीच्या कामात सहभागी व्हावे लागेल. कारण अन्नधान्याची टंचाई भासेल. त्यामुळे तरूण पिढीला शेती करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल आणि शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारायला लागेल.

- मिगेल ब्रागांझा, कृषीतज्ज्ञ

Goa Agriculture
Panaji News : सडलेल्या तांदूळ चौकशीप्रकरणी तिघे कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात

पेडणेत सर्वाधिक पीक क्षेत्र

कृषी विभागाच्या माहितीनुसार गोव्याचे एकूण पीक क्षेत्र 1 लाख 44 हजार 498 हेक्टर आहे. त्यापैकी उत्तर गोव्यात 71 हजार 962 हेक्टर तर दक्षिण गोव्यात 72 हजार 536 हेक्टर पीक क्षेत्र आहे. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात सर्वाधित 17 हजार 019 हेक्टर तर तिसवाडी तालुका हा सर्वात कमी केवळ 10 हजार 735 हेक्टर पीक क्षेत्र आहे. दक्षिण गोव्यात सासष्टी तालुका एकूण 19 हजार 953 हेक्टर पीक क्षेत्रात आघाडीवर आहे. मुरगाव तालुका केवळ 3 हजार 450 हेक्टर पीक क्षेत्रासह तळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com