Panjim Municipality ची 'अष्टमी फेरी Flop'

२०० स्टॉलच्या जागी २ स्टॉल सुद्धा नाहीत (Panjim Municipality)
Panjim Municipality ची 'अष्टमी फेरी Flop'
Panjim MunicipalityDainik Gomantak

जोरदार पाऊस आणि अवेळी केलेले आयोजन यामुळे पणजी महानगरपालिकेने (Panjim Municipality) आयोजित केलेली अष्टमी फेरी (Ashtami Ferri) फ्लॉप ठरली आहे. तब्बल २०० स्टॉल उभारुन ही फेरी सुरु करण्याचा महापालिकेचा बेत होता. मात्र फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत २०० च्या जागी २ स्टॉलही उभे राहू शकले नाहीत. त्यामुळे ही फेरी यंदा रद्द झाली, असे म्हणावे लागेल. गतवर्षीच्या गॅप नंतर यंदा महापालिकेद्वारे पारंपरिक अष्टमी फेरी आयोजित करण्याचे ठरले होते. मात्र जोरदार पाऊस आणि कोरोनाचे संकट यामुळे यंदा फेरी आयोजित कारावी की नाही? या संभ्रमात महापालिका होती. शेवटी ता.६ सप्टेंबर रोजी ७ ते १० सप्टेंबर या काळात फेरी बोट धक्का ते कांपाल (Ferryboat Station to Campal) येथील महावीर उद्यान (Mahavir Garden) या मांडवी किनारी (Mandovi River) ही फेरी आयोजित करण्याचे ठरले.

Panjim Municipality
Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार निर्लज्ज; काँग्रेस अध्यक्ष चोडणकर

जोरदार पावासमुळे व फेरीसाठी पहिला दिवस मंडप उभारण्यास गेल्यानंतर पुढील फक्त तीन दिवस मिळणार असल्याने दुकानदारांनी फेरीत दुकाने थाटण्याकडे पाठ फिरवली. आज ८ सप्टेंबर हा फेरीचा दुसरा दिवस होता, तरी एकही स्टॉल उभा राहीला नाही. ५०० रुपये फॉर्म शुल्क व प्रती १०० रुपयचे १ चौ.मी. या दराने प्रत्येक दिवशी भाडे, असा निर्णय महापालिकेने जाहिर केला होता. मात्र जोरदार पावसामुळे मंडपासाठी लागणारा खर्च व मिळणरे फक्त तीन दिवस यामुळे दुकानदारांनी फेरीत दुकाने थाटण्यास नाकार दिल्याचे कळते.

Panjim Municipality
Goa Politics: काँग्रेस सत्तेवर आली तरच खाणी सुरू होतील...

ग्रामीण भागात माटोळीच्या वस्तू स्वस्त

पणजी मार्केट परिसरात सुरु झालेल्या मोटीळी फेरीत येणाऱ्या माटोळीच्या वस्तू बऱ्याच महाग आहेत. याउलट ग्रामिण भागातील रस्त्याकडेला व बाजारात याच वस्तू पणजीपेक्षा कमी दरात उपलब्ध आहेत. पणजीत तोरींग १५० ते २०० आहे तर ग्रामिण भागात ते १०० रुपयाला मिळत आहे. इतर वस्तूचा दरही पणजीपेक्षा कमी आहे. दरम्यान पणजी मार्केट परिसरात सुरु झालेल्या माटोळी बाजारात गणेशभक्तांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. यंदा माटोळीच्या सर्वच वस्तूंचे दर दुप्पट झालेले आहेत. तरी वर्षातून एकदा आपल्या आवडत्या गणेशाच्या माटोळीसाठी ज्या वस्तू हव्या त्या खरेदी करतांना नागरिक दिसत आहेत.

फॉर्म भरलेत, पण दुकाने थाटली नाहीत

जोरदार पाऊस पडत असल्याने अष्टमी फेरीसाठी दुकानदार पुढे येत नाहीत. तरी सुध्दा १८ जणांनी प्रत्येकी ५०० रुपये भरून फॉर्म नेलेत. मात्र दुकाने थाटलेली नाहीत. दुकानदारानांच्या सुचनेनुसार १२ सप्टेंबर पर्यंत त्यांना वेळ वाढवून दिलेली आहे. जागांचे आरेखनही केलेले आहे. आज संध्याकाळी आपण फॉर्म नेलेल्या दुकानदारांशी बोलणार आहे.

- प्रमेय माईणकर (नगरसेवक व मनपाच्या मार्केट समितीचे अध्यक्ष)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com