माशेल पंचायत कार्यालयाच्या उद्‍घाटनाला पंच लोबो, खडपकर, गाड यांचा विरोध

माशेल पंचायत कार्यालयाच्या उद्‍घाटनाला पंच लोबो, खडपकर, गाड यांचा विरोध

खांडोळा,

तिवरे-वरगाव (माशेल) पंचायतीला कदंब परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांतर्फे माशेल कदंब बसस्थानकात पंचायतीला भाड्याने ऑफिस पाहिजे असल्यास सात दिवसात कळवावे, या आशयाच्या आलेल्या पत्रावर चर्चा करण्यासाठी सरपंच उन्नती नाईक यांनी १५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बोलावलेल्या पंचायत मंडळाच्या खास मिटिंगमध्ये सदर पत्र ठेवण्यात आले. त्यावर माजी सरपंच तथा पंच फ्रान्सिस लोबो, संज्योत खडपकर, पंच सिध्दार्थ गाड यांनी सध्याचे स्वतःचे सोयीस्कर पंचायत ऑफिस असताना पंचायतीने कदंब बसस्थानकावर भाड्याने ऑफिस घेणे, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित नव्या पंचायती कार्यालयाचे उद्‍घाटन, तसेच कार्यक्रमासाठी लागणारा खर्च पंचायत फंडातून करण्याला तीव्र विरोध केला असून त्या विरोधाचे लेखीपत्र सरपंच उन्नती नाईक यांना व पंचायत संचालक पणजी, गटविकास अधिकारी, फोंडा यांना त्यांच्या प्रती दिलेल्या आहेत.
पर्वरीतील सचिवालयात झालेल्या एका मंत्री मंडळाच्या बैठकीत माशेल पंचायतीला कदंब महामंडळातर्फे १३८.१५ मीटर कार्यालय देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार त्या ऑफिसच्या भाड्याचा दर सा.बा.खात्याच्या नियमावलीप्रमाणे चौरस मीटर प्रमाणे भाडे दहा टक्के व्यवस्थापन चार्ज व १८ टक्के जी.एस‌.टी असा आहे. याबाबत माशेल पंचायतीने ७ दिवसाच्या आत मान्यता पत्र द्यावे. एक महिन्याच्या आत कदंब महामंडळाकडे भाडेसंबंधीचे करारपत्र करावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. याप्रकाराला आमचा तीव्र विरोध असल्याचे तक्रारदारांनी नमूद केलेले आहे. २३ एप्रिल २०१३ रोजी सचिवालय, पर्वरी येते प्रियोळचे तत्कालीन आमदार दीपक ढवळीकर, वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई, कदंब परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो, तिवरे वरंगाव तत्कालीन सरपंच व अन्य सरकारी अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीतील करारानुसार माशेल कदंब बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर तिथे माशेल पंचायतीला कार्यालय देण्याचे ठरले होते, असे असताना सध्याच्या चाललेल्या गैरप्रकाराला आमचा विरोध आहे.
सध्या पंचायतीच्या कामकाजासाठी स्वतःची सोयीस्कर जागा असताना तसेच पंचायत क्षेत्रातील नागरिकांना विश्‍वासात न घेता भाड्याचे ऑफिस माशेल कदंब स्थानकात घेणे तसेच त्याचे १६ जून रोजी सकाळी ११ वाजता कोविड १९ महामारीप्रसंगी पंचायतमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करणे, सरपंचाकडून स्वतःच्या मताप्रमाणे पंचायत फंडाचा अपव्यय करणे, याला आमचा सक्त विरोध आहे. या प्रकाराला पाठिंबा देणाऱ्या पंचसदस्याकडून या भाड्याचे पैसे वसूल करावे. पंचायत मंडळातर्फे त्वरित ग्रामसभा घेऊन या प्रकाराबद्‍दल सारासार चर्चा करावी, असे या तक्रारवजा लेखी पत्रात संबंधितातर्फे सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, तिवरे-वरगाव चायतीतर्फे कदंब बस स्थानकाला स्वतःची ११२२ चौ. मीटर जागा, पंचायत ऑफिस व काही दुकाने यांच्या बदल्यात दिलेली असताना घाईगडबडीत माशेल पंचायत क्षेत्रातल्या लोकांना विश्‍वासात न घेता पंचायतीला भाड्याने ऑफिसनेही सध्याचे पंचायत ऑफिस सोयीस्कर असताना घेऊन त्याचे उद्‌घाटन करणे, याबाबत येथील नागरिकांत उलटसुलट प्रतिक्रिया व आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
आज उद्‍घाटन
कदंब बसस्थानक प्रकल्पातील तिवरे-वरगाव पंचायतीच्या नव्या कार्यालयाचे मंगळवार १६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मंत्री गोविंद गावडे, कदंबा महामंडळाचे चेअरमन कार्लूस आल्मेदा उपस्थित राहाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com