Goa: सावर्डेत आमदार गावकरांची प्रतिष्‍ठा पणाला

पाऊसकरांचे आव्‍हान : निवडणूक होणार अटीतटीची; उत्‍सुकता पोचली शिगेला
Goa Panchayat Elections
Goa Panchayat Elections Dainik Gomantak

केपे: सावर्डेचे माजी आमदार दीपक प्रभू पाऊसकर यांचे बंधू संदीप पाऊसकर यांनी सावर्डे पंचायतीचे सरपंच म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यास यश मिळवले होते. आता त्याच जोरावर त्यांनी यावेळी आपली पत्नी सिद्धी पाऊसकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. विद्यमान आमदार गणेश गावकर यांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी सावर्डे पंचायतीच्या सर्व प्रभागांत त्‍यांनी आपले उमेदवार उभे केले असल्याने सावर्डे पंचायतीची निवडणूक रंगतदार ठरण्‍याची शक्‍यता आहे.

(Panchayat Election Situation In Sanvordem)

Goa Panchayat Elections
मतदारसंघांतील मंत्र्यांची तटस्थ भूमिका! पाच मंत्र्यांच्या बालेकिल्ल्याकडे लक्ष

आमदार गावकर यांनी सावर्डे मतदारसंघातील पंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपल्या समर्थकांना पाठिंबा देऊन घरोघरी जाऊन प्रचारही केला आहे. दुसरीकडे संदीप पाऊसकर यांनीही या निवडणुकीत बराच जोर लावल्याने गावकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

बागवाडा दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग सातमध्ये पूर्वी पाऊसकर यांचे कट्टर समर्थक असलेले माजी पंच नितेश भंडारी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित विर्नोडकर हे दोघेही भाजपच्या समर्थनावर निवडणूक लढवत आहेत. दोघांनीही स्वतःचा बॅनरवर आमदार गणेश गावकर यांचा फोटो लावला आहे. याही प्रभागात भाजप समर्थक मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. आंबेउदक प्रभागात एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपचे कार्यकर्ते संभ्रमावस्‍थेत

टोनीनगरच्या प्रभाग तीनमध्ये माजी सरपंच दीपक सावंत आणि सर्वेश सावंत हे दोघेही भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. दीपक सावंत यांनी आमदार गणेश गावकर यांचा आपल्याला पाठिंबा आहे असा दावा केला आहे. त्यांच्या बॅनरवर गणेश गावकर यांचा फोटोही आहे. पण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे सर्वेश सावंत यांनाही भाजपच्या स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे. संकेत आर्सेकर हे त्यांच्यासाठी काम करत आहेत. खासदार विनय तेंडुलकर यांनीसुद्धा नुकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com