बार्देशात 33 पैकी दोनच ग्रामपंचायतींमध्ये स्थिरता !

31 पंचायतीत संगीतखुर्ची : नेत्यांच्या वर्चस्व वादात रंगला सत्तेचा पट
बार्देशात 33 पैकी दोनच ग्रामपंचायतींमध्ये स्थिरता !
Panchayat Dainik Gomantak

म्हापसा : राजकीयदृष्ट्या महत्त्व लाभलेल्या बार्देश तालुक्यात मागील पाच वर्षांत या पंचायतींवर अस्थिरता दिसली. एकूण सात विधानसभा मतदारसंघातील 33 पैकी केवळ 2 पंचायतींच्या सरपंचांनी कार्यकाळ पूर्ण केला. यात हणजूण-कायसूव व कामुर्ली या पंचायतीचा अपवाद असून 31 पंचायतीत सातत्याने संगीत खुर्चीचा खेळ झाला.

Panchayat
अंगणवाडी सेविकांचे उपोषण सत्र सुरूच

स्थानिक ग्रामस्वराज संस्थांवर नेत्यांकडून वर्चस्व दाखविण्याच्या चढाओढीत अनेक ठिकाणी हा सत्तेचा पट रंगला. विकासकामांवरसुद्धा परिणाम झाला. दुसरीकडे हणजूण-कायसूव पंचायतीने मागील पाच वर्षांत तीन उपसरपंच बदलले. तर कामुर्ली पंचायतीने आपला दोनदा उपसरपंच बदलला. तर हळदोणा, कळंगुट व हडफडे-नागवा पंचायतीने एकंदर कालावधीत पाच सरपंच पाहिले. त्यानंतर अस्नोडा, कोलवाळ, नास्नोळा, पेन्ह दी फ्रान्स, पिर्णा, सुकूर व थिवीत प्रत्येकी चार सरपंच बदलले. शिवाय कांदोळी, गिरी, नादोडा, पिळर्ण-मार्रा, रेईश-मागूश, रेवोडा, साळगाव, साल्वादोर दी मुंद, सांगोल्डा, शिवोली, शिरसई या पंचायतींनी प्रत्येकी तीन सरंपच बदलले.

हळदोणा पंचायतीने पाच सरपंच बदलले. यात पहिले सरपंच गजानन हळदणकर यांनी वैयक्तिक कारणास्तव केवळ आठ महिन्यांतच आपला राजीनामा दिला. तर दीपक नाईक व फ्रान्सिस्को डिसोझा यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला. तर सुभाष राऊत यांनी देखील वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला. त्यानंतर, प्रणेश नाईक हे विद्यमान सरपंच आहेत.

Panchayat
...आणि विझले निखारे पुन्हा सरले

कळंगुट पंचायतीचा महसूल हा बार्देशातील इतर पंचायतींपेक्षा सर्वाधिक आहे. या मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांचे या कळंगुटमधील चारही पंचायतींवर वर्चस्व आहे. कळंगुट पंचायतीने आतापर्यंतच्या कार्यकाळात पाच सरपंच पाहिले. या पंचसदस्यांनी अलिखित करारानुसार वाटण्या करीत हे पद भूषविले. ज्यात तत्कालिन सरपंच अँथनी मिनेझिस, फ्रान्स्किो रॉड्रिग्स, दिनेश सिमेपुरुषकर यांचा समावेश आहे. तर शॉन मार्टिन्स आता पुन्हा सरपंच आहेत.

सात पंचायतींच्या उपसरपंचांत बदल नाही : 33 पंचायतींपैकी केवळ दोन पंचायतींचे सरपंच बदलले नाहीत. तसेच 7 ठिकाणी उपसरपंचांत बदल झाला नाही. ज्यात हडफडे, कांदोळी, नास्नोळा, नादोडा, पोंबुर्फा-ओलावळी, शिवोली, वेर्ला या पंचायतींची वर्णी लागते. तर सर्वांधिक उपसरपंच बदलण्याचा पराक्रम हा हळदोणा (5 वेळा), आसगाव (5), बस्तोडा (4), कळंगुट (4), पर्रा (5) यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com