Solutions For Waste: कचऱ्यासाठी पंचायतींनी उपाययोजना करावी

गुदिन्हो: वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये पंचायतीच्या पंचायतघराचे उद्‍घाटन; कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होणार
Inauguration of Panchayat House
Inauguration of Panchayat HouseDainik Gomantak

गोवा हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असून पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी राज्य स्वच्छ आणि सुंदर ठेवताना पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. (Solution For Waste Management)

इतरत्र कचरा फेकण्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी होत असून हे प्रकार रोखण्यासाठी पंचायतींनी प्रभावी उपाययोजना करावी आणि राज्याला समृद्ध करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

म्हार्दोळ येथे रविवारी वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीच्या नूतन पंचायतघराचे उद्‍घाटन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, श्रमेश भोसले, सरपंच हर्षा गावडे, उपसरपंच रुपेश नाईक, बेतकी खांडोळा सरपंच विशांत नाईक, वेरे वाघुर्मे सरपंच शोभा पेरणी तसेच इतर पंचसदस्य, पंचायत उपसंचालक प्रसिद्ध नाईक, गटविकास अधिकारी आश्‍विन देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.

माविन गुदिन्हो म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचा सातत्याने विकास होत आहे.

मोपा विमानतळ, झुआरीचा नवीन पूल आणि इतर विकासकामे ही गोव्यासाठी उपलब्धी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने हा विकास होत असल्याने स्थानिक आमदार व मंत्री गोविंद गावडे यांच्या अथक प्रयत्नातून प्रियोळ मतदारसंघातील विकासकामे साकारत आहेत.

त्यामुळे जे चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या पाठीशी लोकांनी उभे रहायला हवे.

स्वागत सरपंच हर्षा गावडे यांनी केले, सूत्रसंचालन रोहित खांडेकर यांनी तर सुशांत नाईक यांनी आभार मानले.

कचरा प्रकल्प अन् गोशाळा-

प्रियोळ मतदारसंघात कचरा प्रकल्प साकारण्याबरोबरच गोशाळेची स्थापना होणार आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे राज्य स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत.

इमारतीत राहणाऱ्यांकडून असे प्रकार जास्त प्रमाणात होत असून गावात कुठेच असा प्रकार दिसत नाही, त्यामुळे पुढील काळात कचराफेकूंवर कारवाई करण्यासाठी प्रभावी उपाययोजना होतीलच, पण जबाबदार नागरिकांनी अशा कचराफेकूंना पकडून त्यांना जाब विचारण्याची आवश्‍यकता आहे, असे गोविंद गावडे म्हणाले.

Inauguration of Panchayat House
Goa Lokotsav 2023: लोकोत्सवात खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर झुंबड

प्रियोळ मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या वचनांची पूर्तता होत असल्याने या मतदारसंघाला चांगले ते देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहिला आहे.

पंचायतघराबरोबरच भूमिगत वीजवाहिन्या, नवीन पोलिस स्थानक इमारत, बाणस्तारी येथील बाजार प्रकल्प आणि इतर विकासकामे साकारत असल्याने प्रियोळचा कायापालट होत आहे.

पंचायत घराच्या इमारतीत वीज तसेच इतर सरकारी खाती, वाचनालय आदी उपलब्ध होणार असून हे सगळे लोकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले.

- गोविंद गावडे, कला संस्कृती मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com