स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत पंडीत जवाहरलाल नेहरूंचे मोठे योगदान

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

"भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवून आणि त्यानंतर स्वातंत्र्य भारताच्या जडणघडणीत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे फार मोठे योगदान आहे.त्यांनी घातलेल्या बुनियादीमुळे व योगदानामुळेच  आज देश इतकी प्रगती करु शकला"

पेडणे:  "भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवून आणि त्यानंतर स्वातंत्र्य भारताच्या जडणघडणीत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे फार मोठे योगदान आहे.त्यांनी घातलेल्या बुनियादीमुळे व योगदानामुळेच आज देश इतकी प्रगती करु शकला" असे प्रतिपादन करु शकला असे प्रतिपादन  उत्तर  गोवा प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष उल्हास वंसकर यांनी शिरगळ धारगळ येथे बोलतांना केले.पंडीत जवाहरलाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री. वंसकर म्हणाले कि,देशाच्या स्वातंत्र्यात पंडित नेहरूंनी आपणाला झोकून घेतले. उच्च शिक्षीत, राजबिंड्या घराण्यातील असून देशप्रेमाने ते भारावून गेले होते.देशप्रेमामुळेच त्यांनी काही वेळा त्यांनी लाठीकाठ्याही खाल्ल्या. अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.त्याच बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी साहित्यिक क्षेत्रालाही मोठे योगदान दिले आहे.त्यांना लहान मुलांचा बराच  लळा होता.ते जेथे जात तिथे मुलांचे ते बरेच लाड करत असत.त्यामुळेच ते मुलांचे लाडके चाचा झाले.ज्या देशात काहीच निर्माण होत नव्हते  तीथे देशाने आज सगळ्या क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे.

नोट बंदीसारख्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे.पण ज्या लोकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी काहीही केले नाही, नोटा बंदीसारखा निर्णय घेऊन लोकांना यातना  दिल्या व ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती  बिघडून टाकण्याचे  निर्णय घेतले असे लोक  डोळ्यावर राजकीय झापडे ओढून जवाहरलाल नेहरूंच्या कर्तृत्वावर  टीका करतात ही दुर्दैवी गोष्ट आहे.कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगवयाचा थांबत  नसतो  हे त्यांनी लक्षात ठेवावे असे ते म्हणाले.विठ्ठल करमळकर  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तारक वंसकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या