मोबाईलसाठी पांडुरंगची ‘आत्‍मनिर्भर’ता

pandurang
pandurang


पद्माकर केळकर 
वाळपई :

गरिबी ही माणसाला प्रत्येकवेळी अनेक कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी बळच देत असते. शिक्षणासाठी अनेकजण धडपड करीत असताना समाजात आढळून येतात. एरव्ही माध्यमिक शालेय शिक्षण घेत असताना मुलांचे आई-वडील हव्या त्या गरजा पुरवत असतात. पण, काही मुले आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून वेळप्रसंगी स्वत: कष्ट घेतात. सत्तरी तालुक्यातील सोनाळ गावात राहणारा व सावर्डे सरकारी माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीत शिकणारा कु. पांडुरग रामचंद्र गावकर या विद्यार्थ्याची कष्‍टप्रद धडपड अन्‍य विद्यार्थ्यांनी आदर्श घेण्‍याजोगी आहे.

सध्‍या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्याने शाळा बंद आहेत. त्यावर पर्याय म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक अंमलबाजवणी करीत आहेत. पण, ग्रामीण भागात गरीब कुटुंबातील मुलांच्या आई-वडिलांना महागडा मोबाईल घेण्याची ऐपत नसते. त्यामुळे अनेक मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. आठ - दहा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी कसा करावा यावर उपाय म्हणून पांडुरंग गावकरने स्वत: रोजंदारीवर काम करण्याचे ठरविले व आत्मनिर्भरतेने काजू बागायतीत कष्‍टाचे काम सुरू केले आहे.

परिस्‍थितीपुढे नाही सोडली जिद्द!

घरच्‍या आर्थिक परिस्‍थितीमुळे पांडुरंगच्‍या कुटुंबाकडे मोबाईल खरेदीसाठी पैसे नव्‍हते. तरीही त्‍याने हिंमत, जिद्द सोडली नाही. मोबाईलसाठी परिस्‍थितीविरुद्ध लढण्याची तयारी ठेऊन त्‍याने गावात काजू लागवडीची कामे सुरू आहेत तिथे त्‍याने कष्‍टाची तयारी दर्शवली व कामही सुरू केले. या प्रकारातून आजची युवा पिढी आत्मनिर्भर बनत असल्‍याचे दिसत आहे.

पुष्‍पराज, कृष्‍णा यांचेही सहकार्य

रोजंदारीवर काम करत शिक्षण घेऊन, नावारुपाला आलेल्या कितीतरी नामवंतांची उदाहरणे आहेत. दुसरीकडे मोबाईलच्या हट्टापायी गरीब कुटुंबातील आया - बहिणींना स्वतःचे सौभाग्यालंकार विकावे लागले आहेत. पण, पांडुरंगने शिक्षणासाठी आत्मनिर्भर कसे बनायचे याचा आदर्श इतरांनीही घ्‍यावा. सोनाळ गावातील कु. पुष्पराज गावकर, कृष्णा गावकर हे बारावीतील विद्यार्थी पांडुरंग याच्‍यासोबत काम करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com