साखळीच्या नगराध्यक्षपदी राजेश सावळ यांची निवड

मुख्यमंत्री समर्थक गटाला हादरा : पालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला
Sanqualim Mayor Election | Rajesh Sawal News
Sanqualim Mayor Election | Rajesh Sawal NewsDainik Gomantak

डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील साखळी पालिका आपल्या ताब्यात घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरला आहे. या पालिकेवर ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाने आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे. आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाचे नगरसेवक राजेश सावळ यांची निवड झाली आहे.(Sanqualim Mayor Election News)

सावळ यांनी प्रतिस्पर्धी गटाचे यशवंत माडकर यांचा एका मताने पराभव करून नगराध्यक्षपदाची खुर्ची हस्तगत केली आहे. या निकालाने मुख्यमंत्री डॉ. सावंत समर्थक गटाला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. दरम्यान, विद्यमान उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याने आता उपनगराध्यक्षपद रिक्त झाले आहे.

राया पार्सेकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी गुरुवारी (ता. 26) पालिका मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीला सत्ताधारी गटाचे मावळते नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्यासह राजेश सावळ, धर्मेश सगलानी, अंसिरा खान, कुंदा माडकर, ज्योती ब्लेगन आणि राजेंद्र आमेशकर तर विरोधी गटाचे यशवंत माडकर, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, ब्रम्हा देसाई, रश्मी देसाई आणि शुभदा सावईकर मिळून तेराही नगरसेवक उपस्थित होते.

Sanqualim Mayor Election | Rajesh Sawal News
गोवेकरांच्या ताटात परराज्यातील मासळी

निवडणुकीनंतर माजी आमदार प्रताप गावस यांच्यासह प्रवीण ब्लेगन, खेमलो सावंत आदींनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सावळ यांचे अभिनंदन केले. नगराध्यक्षपदी निवड झाल्याने राजेश सावळ यांनी समाधान व्यक्त केले. सर्वाना विश्वासात घेऊन विकास प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षपदासाठी राजेश सावळ आणि यशवंत माडकर यांच्यात लढत झाली. राजेश सावळ यांना सात, तर यशवंत माडकर यांना सहा मते पडली व केवळ एका मताने राजेश सावळ विजयी ठरले. निवडणूक अधिकारी म्हणून डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांना मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com