Panaji Session Court : 2.14 कोटी चेक बाऊन्स प्रकरण! प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक मोनी यांना सहा महिन्यांची शिक्षा

पणजी सत्र न्यायालयाने फेटाळली याचिका
Court | Goa News
Court | Goa News Dainik Gomantak

Panaji Session Court : पणजी सत्र न्यायालयाने प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक व्यंकटेश नारायण प्रभू मोनी यांची याचिका फेटाळली आहे. 2.14 कोटी रुपयांचा धनादेश बाऊन्स प्रकरणी प्रभू कन्स्ट्रक्शन्सचे मालक व्यंकटेश प्रभू मोनी यांच्या विरोधातील पणजी न्यायालयाचा सहा महिन्यांचा सक्तमजुरीचा निवाडा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवला आहे.

Court | Goa News
Goa Fire News : राज्यात दिवसभरात तीन आगीच्या घटना; जीवीतहानी नाही, लाखोंचे नुकसान

तक्रारदार सहजानंद इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत फिर्यादीने असे म्हटले होते की, आरोपीने तक्रारदारास दोन कोटी चौदा लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार आरोपीने तक्रारदारास 7 मार्च 2019 रोजी दोन कोटी चौदा लाख रुपयांचा धनादेश दिला होता.

हा धनादेश तक्रारदाराच्या खात्यात मंजुरीसाठी जमा करण्यात आला. मात्र अपुऱ्या निधीमुळे धनादेश बाऊन्स झाला. याबाबत बँकेने तक्रारदारास मेमोद्वारे कळवले. त्यानंतर तक्रारदाराने, त्याच्या वकिलामार्फत आरोपी कंपनी आणि मालकाला कायदेशीर नोटीस जारी केली.

Court | Goa News
Vijai Sardesai : 'मी नाही तुम्हीच जा'; जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही

पण ते ठरलेली रक्कम देण्यास असमर्थ ठरले. नंतर, JMFC न्यायालयाने आरोपीला सदर कायद्याच्या कलम 138 नुसार दंडनीय गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आणि त्याला सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

आरोपीला तक्रारदारास एका महिन्याच्या आत दोन कोटी चौदा लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच ते पैसे देण्यास असमर्थ ठरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

आरोपीने पणजी सत्र न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले होते. मात्र पणजी सत्र न्यायालयाने अपील फेटाळून लावत JMFC न्यायालयाने दिलेली शिक्षा आणि नुकसान भरपाईची रक्कम कायम ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com