Goa BJP: गोव्यात भाजपकडून बिलावल भुट्टो झरदारीच्या पुतळ्याचे दहन करत मोदींविरुद्धच्या वक्तव्याचा निषेध

Goa BJP: गोवा भाजप कार्यालयासमोर झरदारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

Goa BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून गोवा भाजपने शनिवारी सायंकाळी भाजप कार्यालयासमोर झरदारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याप्रसंगी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार संकल्प आमोणकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळकर, दामू नाईक, शर्मद रायतूरकर यांच्यासह भाजप व भाजयुमोचे कार्यकर्ते सहभागी होते.

तानावडे म्हणाले, बिलावल यांनी केलेल्या वक्तव्याचा देशभर भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. मोदी यांनी देश पुढे नेण्याचे काम केले आहे, हे पाकिस्तानच्या नेत्यांना खूपत असल्यानेच बिलावल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी गरळ ओकली आहे.

सर्वांना घेऊन विकास करीत मोदी हे काम करीत आहेत. जगभरात मोदी यांची प्रतिमा एक विशिष्ट उंचीवर पोचली आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि त्यांच्यातील आकस पाहून अशी वक्तव्य व्यक्त होत आहेत, त्याचा भाजप निषेध करीत आहे. सावईकर म्हणाले, पाकिस्तानने आपल्या देशाचे भाग सांभाळण्याकडे लक्ष द्यायला हवे. बिलावल यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत.

Goa BJP
Dudhsagar Falls: गोव्यातील मनमोहक दूधसागर पाहायचांय..? तर आत्ताच करा 'ऑनलाईन बुकींग'

तानावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलण्याचा हक्क झरदारी यांना नाही, तरीही त्यांनी पंतप्रधानांची माफी मागावी. दामू नाईक यांनीही झरदारी यांच्या कृत्याचा निषेध केला. आमदार आमोणकर यांनीही आपले मत व्यक्त केले.

सिद्धार्थ कुंकळ्ळकर म्हणाले, पाकिस्तानच्या नेतृत्वाचा आम्ही निषेध करीत आहोत. या देशाकडे दहशतवादी निर्माण करणारा देश म्हणून पाहिले जाते. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी जे वक्तव्य पाकच्या मंत्र्याने केले आहे, ते निषेधार्ह आहे.

देशात विविध ठिकाणी निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध देशात विविध ठिकाणी निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी बिलावल यांचे पुतळे जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभर होत असलेली स्तुती पाकिस्तानला खूपत आहे, म्हणूनच त्यांचे मंत्री अशी बेताल वक्तव्य करीत आहेत, अशी टीकाही देशभरातून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com