काणकोणात उद्या ‘पालक सन्मान दिवस’

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका अकल्पिता राऊत देसाई असतील.
काणकोणात उद्या ‘पालक सन्मान दिवस’
Parent Honor DayDainik Gomantak

काणकोण: देळे-काणकोण येथील ज्ञान प्रबोधिनी मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचा वार्षिक ‘पालक सन्मान दिवस’ यंदा शनिवार दि. 14 मे रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

पालक सन्मान, पालक शिक्षक मेळावा, नूतन कार्यकारणीची स्थापना आणि के. बी. गावकर यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा असे सदर कार्यक्रमाचे स्वरुप राहणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका अकल्पिता राऊत देसाई हजर असतील. ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन मंजू देसाई हे सदर सोहळ्याचे अध्यक्ष असून उपाध्यक्ष के. बी. गावकर, सचिव मंजुनाथ देसाई, खजिनदार राजेंद्र देसाई, पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्ष स्नेहा देसाई आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. मनोज कामत आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असतील.

Parent Honor Day
गोव्यातील 'कन्नड' समाजाच्‍या घाेषणेमुळे नवा वाद

पालक-शिक्षक संघाच्या वतीने प्रतिवर्षी ‘पालक सन्मान दिवस’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या तिसऱ्या पालक सन्मान सोहळ्यात महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना शिक्षण, क्रीडा, एनएसएस, एनसीसी, कला आणि संस्कृती आदी क्षेत्रांतून यशस्वी कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात येईल. तसेच पुढील तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारणीची निवडही या दिवशीच केली जाईल. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. रुपा चारी यांनी केले आहे.

Parent Honor Day
'डिचोली मतदारसंघात सुसज्ज मैदाने उपलब्‍ध करणार'

सोहळ्‍याचे मानकरी कृष्णराव गावकर

याच दिवशी महाविद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी मंडळाच्या एका मान्यवर आणि ज्‍येष्‍ठ सदस्याचा सत्कार होतो. मागच्या वर्षी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रामदास माजाळकर यांच्या सन्मान प्रा. भास्कर नायक यांच्या हस्ते करण्‍यात आला होता. यंदा मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णराव बी. गावकर हे कृतज्ञता सत्कार सोहळ्याचे मानकरी असून सदर सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्‍यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.