मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षणाची संधी द्या

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

आमदार सोपटे : आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सवात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मोरजी - पालकांनी आपल्या इच्छांपूर्तीसाठी आपल्या मुलावर दबाव न आणता त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेण्याची मुभा द्यायला हवी तरच विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात असे प्रतिपादन मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी केले. 

आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या  १० वी आणि १२ वी तील यशवंत विध्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष चोडणकर ,सचिव सखाराम नागवेकर ,खजिनदार सुदन नाईक , महिला विभाग प्रमुख सौ महिमा परब ,श्री सातेरी देवस्थानचे सचिव सज्जन बगळी ,श्री नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष भिंगा हाडकी ,आदी उपस्थित होते 
आमदार श्री सोपटे यांच्या हस्ते यशवंत विध्यार्थी इयत्ता १० वी –  कु.सयामा मुझाम्मील हुसेन [८५.३३ टक्के ]कु.रघुनाथ राजेंद्र चोडणकर [८२.५० टक्के ]कु.सना राजेंद्र राऊत[७६.८३ टक्के]  कु.साक्षी देवानंद गोसावी [७५.८३ टक्के] कु.दिशा जयराम बगळी [७५.५० टक्के] बारावी –कु.दर्शिता जयराम बगळी [८७.३३ टक्के ]कु.श्रुती सुदन राऊत [७८.६६ टक्के ] सानिषा दर्शन राऊत [७८.५० टक्के ] यांना प्रशस्ती पत्र,सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले 

यावेळी बोलताना आमदार श्री सोपटे पुढे म्हणाले की,गावातील हुशार विध्यार्थी गावचे भूषण असते आपल्या आई –वडिलाप्रमाणे असे विध्यार्थी गावाला प्रतिष्ठा मिळवून देतात आज शिक्षण हाच विकासाचा राजमार्ग आहे एक काल असा होता कि श्रीमंताचीच मुले उच्च शिक्षण घेवू शकत होती आज उलट झालेले आहे गरीबाची मुले मेहनतीच्या जोरावर उच्च शिक्षा विभूषित होत आहे यासाठी त्यांनी स्वताचे उदाहरण देताना आपण प्रतिकूल परिस्थित कसे शिक्षण घेतले हे सांगितले आपण मोरजी येथील विध्याप्रसारक हायस्कूल मध्ये शिकत असताना चार-पाच किमी अनवाणी चालत जायचे गरीबीचे चटके काय असतात हे मी अनुभवले आहे उन्हातान्हातून अनवाणी चालताना चटके सहन केले आहेत त्यामुळे शिक्षणाचे महत्व आपल्याला माहित आहे आजच्या विध्यार्थ्यानी सुद्धा आजच्या काळात शिक्षणाला असलेले महत्व जाणून आपले करियर घडवायला हवे गरजूंना आपण निश्चितच मदत करीन असे त्यांनी सांगितले. यावेळी कु.दर्शिता बगळी हिने विध्यार्थ्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. 

प्रारंभी विठोबा बंगळी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला जयानंद गावकर, बाबली राऊत, दिवाकर परब, वामन चोडणकर, निलेश नाईक सौ.जीविता बगळी विजय परब .यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केलेयावर्षीची गणेश मूर्ती प्रदान करणाऱ्या सुधीर नवसो बगळी यांना गुलाब पुष्प प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सुदन नाईक यांनी   यशवंत विद्यार्थ्यांची नावे वाचली सखाराम नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले संतोष चोडणकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या