खांडेपारमध्ये वर्ग बंद असल्याने शुल्क भरण्यास पालकांचा नकार

वार्ताहर
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

खांडेपार येथील एका खासगी संस्थेच्या विद्यालयाच्या पालकांनी शाळा बंद असताना प्रवेश शुल्क भरण्यास विरोध दर्शवला आहे. या संबंधीची बुधवार सकाळी मुख्याध्यापिका व पालक यांच्यात प्रवेश शुल्काविषयी चर्चा झाली.

फोंडा: खांडेपार येथील एका खासगी संस्थेच्या विद्यालयाच्या पालकांनी शाळा बंद असताना प्रवेश शुल्क भरण्यास विरोध दर्शवला आहे. या संबंधीची बुधवार सकाळी मुख्याध्यापिका व पालक यांच्यात प्रवेश शुल्काविषयी चर्चा झाली. त्यात मुख्याध्यापिकेने संस्थेच्या इतर प्राथमिक व पूर्व प्राथमिक पाच शाळा प्रमाणे विद्यार्थ्यांचे पूर्ण प्रवेश शुल्क भरून पाठ्यपुस्तके नेण्याची सूचना पालकांना चर्चेत केली. परंतु पालकांनी मुख्याध्यापिकेकडे केलेली चर्चा फिस्कटली असून पालकांनी शाळा बंद असताना  पन्नास टक्के म्हणजे अर्धे प्रवेश शुल्क भरण्यास राजी झाले असून पूर्ण प्रवेश शुल्क भरण्यास विरोध दर्शवण्यात आला.

खांडेपार येथील या विद्यालयाच्या मैदानावर बुधवारी सकाळी विविध ठिकाणचे शंभरावर पालक जमले होते. या चर्चेलाच पाच ते सहा पालकच हजर होते. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद असून शाळा बंद असताना पालकांना विद्यार्थ्यांची पूर्णप्रवेश शुल्क भरून पाठ्यपुस्तके नेण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळा बंद असताना पूर्ण प्रवेश शुल्क भरणे पालकांना शक्य नसून पाठ्यपुस्तके व वह्या नेऊन काय करणार असा प्रश्‍न पालकांनी केला. 

या शाळेचे पालक शिक्षक समितीचे सदस्य पालकांचा प्रश्‍न सोडवयाचे सोडून गैरहजर राहत असल्याने यावेळी पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळा सुरू झाल्यास संबंधित शुल्क भरण्यास पालक तयार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेऊन काहीच फायदा नसून दिलेला अभ्यास विद्यार्थी करीत नसल्याचे पालकांनी सांगितले. शाळेच्या प्रवेश शुल्कापेक्षा विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पाठ्यपुस्तकांना जास्त पैसे मोजावे लागत असून पाठ्यपुस्तके घेऊन पालकांना मुलांना अभ्यास घरी दाखवावा लागत असल्याचे पालकांनी सांगितले. दरम्यान बुधवारी सकाळी पालकांची मुख्याध्‍यापिकाकडे झालेली चर्चा पालकांनी पूर्ण प्रवेश शुल्क भरण्यास मान्य नसल्याने चर्चा फिस्कटल्यात जमा झाली असून पालक आपल्या निर्णयाशी ठाम राहिले आहे.
 

संबंधित बातम्या