खांडेपार शाळेत "ट्यूशन फी' भरण्यास पालकांकडून नकार

Nishit Tari
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

एका बाजूला कोरोनाची महामारी, लॉकडाऊनमुळे नोकरी व व्यवसायावर गंडांतर आले आहे. रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, खिशात पैसा नसल्याने कसाबसा संसार चालवणाऱ्या पालकांना आता ही फी भरणे म्हणजे आर्थिक भूर्दंड असून शाळा, विद्यालये काही सुरू झालेली नाहीत,

पाळी,   कोरोनाच्या महामारीमुळे सध्या शैक्षणिक वर्षावर आफत आली आहे. शाळा, विद्यालये बंदच आहेत, मात्र राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना शाळा, विद्यालयांना केली आहे. शाळा विद्यालयांत विद्यार्थ्यांसाठीचे पालकांकडून कोणतेच शुल्क स्विकारू नये, असे खुद्द मुख्यमंत्री तथा शिक्षण खात्याचा ताबा असलेले डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे, मात्र काही खाजगी संस्थांच्या शाळांकडून पालकांकडून ट्यूशन फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.
फोंडा तालुक्‍यातील काही खाजगी शिक्षण संस्थांत ही परिस्थिती असून खांडेपार येथील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक वर्ग चालवणाऱ्या विद्यालयाकडून तर जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे साडेसातशे रूपये पालकांनी त्वरित भरावेत, अशी नोटीस दिली आहे.
एका बाजूला कोरोनाची महामारी, लॉकडाऊनमुळे नोकरी व व्यवसायावर गंडांतर आले आहे. रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, खिशात पैसा नसल्याने कसाबसा संसार चालवणाऱ्या पालकांना आता ही फी भरणे म्हणजे आर्थिक भूर्दंड असून शाळा, विद्यालये काही सुरू झालेली नाहीत, त्यामुळे ट्यूशन फी कशी काय भरायची, असा सवाल या विद्यालयाच्या पालकांनी केला आहे.
नियमित शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ट्यूशन फी भरायला आम्ही तयार आहोत, पण आता कोरोनामुळे शाळा, विद्यालये बंदच असल्याने ट्यूशन फी माफ करावी, अशी जोरदार मागणी या पालकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या