सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सहामहिन्यानंतर शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो सरकारने विचारपूर्वक घेतला असेल, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे त्याचबरोबर वर्गात बसताना सामाजिक अंतर ठेवून बसण्याबरोबरच मधल्या सुट्टीत, शारीरिक शिक्षणाच्या वेळी मैदानावर खेळ खेळताना तसेच प्रयोगशाळा, सकाळी प्रार्थनेच्या वेळी गर्दी होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष पुरवणे गरजेचे आहे

बोरी: कोविड संसर्गामुळे  शिक्षक ऑनलाईन पध्दतीने मुलांचे वर्ग घेतात. परंतु बऱ्याच मुलांकडे मोबाईल नाहीत तसेच बऱ्याच ग्रामीण आणि दुर्गम भागात मोबाईलना रेंज नसल्याने या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा लाभ मुलांना घेता येत नाही. आता सहामहिन्यानंतर शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो सरकारने विचारपूर्वक घेतला असेल, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे त्याचबरोबर वर्गात बसताना सामाजिक अंतर ठेवून बसण्याबरोबरच मधल्या सुट्टीत, शारीरिक शिक्षणाच्या वेळी मैदानावर खेळ खेळताना तसेच प्रयोगशाळा, सकाळी प्रार्थनेच्या वेळी गर्दी होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष पुरवणे गरजेचे आहे. सुरक्षिततेसाठी नियमांचे पालक आवश्यक आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षक जयवंत आडपईकर यांनी व्यक्त केले.

पालकांनी आपल्या पाल्यांना मास्क बांधून शाळेत पाठवायला हवे. तसेच कोविड-19 ची बाधा होऊ नये म्हणून कुठेही स्पर्श केल्यावर सेनिटायझेशन चा वापर करण्यासाठी छोटी बाटली दप्तरात घालून नेण्यासाठी द्यायला हवा. शाळेचे वर्ग लहान असल्यास आणि सामाजिक अंतर ठेवून वर्गात सर्व विद्यार्थी मावत नसल्यास आली पाळीने वर्ग घ्यायला हवे. पालकांना आपली मुले शाळेत गेलेली हवीत, परंतू ती सुखरूप राहावीत. हीच पालकांची इच्छा आहे. वर्गातच मुले शिक्षकांनी जीव ओतून शिकवले, तरी काही विद्यार्थी लक्ष देत नाहीत. ते मोबाईलवर ऑनलाईन पध्दतीने कशी काय शिकतील, असा प्रश्‍न पडतो म्हणूनच शाळा सुरू व्हायला हव्यात, असे मत जयवंत अडपईकर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी नियम पाळावे ः बोरकर
गेले सहामहिने घरी राहून मुले कंटाळून गेली आहेत. ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेण्यास अनेक प्रकारच्या अडचणी आहेत शिवाय वर्गात अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारी मुले मोबाईलवर शिक्षण घेऊ शकत नाही. शासनाने शाळा सुरू करताना खबरदारी घेऊन एकत्रित येणाऱ्या मुलांना कोविडचा संसर्ग होणार नाही, याबद्दल खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळातील मुलांना घरून आणण्यासाठी आणि पुन्हा पोचवण्यासाठी बालरथ उपलब्ध आहेत परंतु त्यांचे रोज निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. शाळेत सामाजिक अंतर ठेवून मुलांना बसवले पाहिजे, असे पालकांचे मत आहे. तसेच तोंडाला मास्क बांधून मुलांना पाठवले तरी ते मास्क वर्ग सुटेपर्यंत ठेवणे बंधनकारक असावे. निदान शाळा सुरू झाल्यावर नवीन कल्पना येतील. त्यासाठी पूर्वी शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिकण्यास मिळेल व शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद देणे गरजेचे आहे, राया बोरकर यांनी मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या