पालक विद्यार्थी बुचकाळ्यात

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

एका रेल्वेत पॉसिटीव्ह रुग्ण सापडल्याने ती बंद करून दुसऱ्या रेल्वेला मान्यता देण्यात येत आहे. याचा अर्थ सरकार वेगवेगळे विचार करून सुरक्षित गोवा धोकादायक बनवित आहे.

सांगे

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने सर्वत्र खळबळ माजू लागली असून रेल्वे असो किंवा अन्य मार्गातील व्यवस्था भाहेरील लोकांना गोव्यात आणताना जी चूक करण्यात आली त्यांचा परिणाम आता गोव्यात दिसू लागल्याने सरकार विरोधात मोठया प्रमाणात तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. सरकारला गोमंतकीय लोकांना गोव्यात आणायचे असल्यास रेल्वे सोडून अन्य वाहनातून आणणे शक्य असताना गोव्यातील लोकांबरोबर दुसऱ्या राज्यातील लोकांनाही सुरक्षित गोव्यात आणून "सुशेगाद "गोमंतकीयांना सरकारने चिंताग्रस्त करून सोडले आहे. 

      केवळ गोमंतकीय आले असते तर एकवेळ समजता येते. पण सरकारने बोलाविलेल्या रेल्वेतून गोमंतकिया बरोबर रशियन पर्यटक आले, गोव्यात हनिमून साजरा करण्यासाठी सुरक्षित गोव्यात परप्रांतीय आले आहे. एका रेल्वेत पॉसिटीव्ह रुग्ण सापडल्याने ती बंद करून दुसऱ्या रेल्वेला मान्यता देण्यात येत आहे. याचा अर्थ सरकार वेगवेगळे विचार करून सुरक्षित गोवा धोकादायक बनवित आहे. पॉसिटीव्ह रुग्णांना हाताळताना पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय कर्मचारी आणी अधिकारी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार सरकारने कधी केला आहे काय. उद्या लागण झाली तर संपूर्ण गोवा उद्वस्त व्हायला उशीर लागणार नाही. 

      त्यात राज्यात दहावी बारावीची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परिस्थिती चांगली होती तेव्हा पालकांनी परीक्षा घेण्यासाठी मागणी केली होती. पण त्यावेळी राज्यात परिस्थिती वेगळी होति आणी आज परिस्थिती बदललेली आहे. सरकार म्हणतो पालकांनी मागणी केली आहे म्हणून परीक्षा घेणारच. अठरा हजार पालकां पैकी किति पालकानी सरकार कडे परीक्षा घेण्यासाठी मागणी केली असेल. शंभर दोनशे पालक असतिल. पण आज हजारो पालक भयभीत झाले आहे. दोन तीन दिवसात परीक्षा सुरु होणार किमान आठ दिवस परीक्षा चालणार. आज राज्यात पॉजिटीव्ह आकडा दर दिवशी वाढत आहे. अजून आठ दिवसात शंभर पार होतील. अश्या वातावरणात राज्यात परीक्षा घेणे सोयीस्कर होईल. अजूनही राज्यात देश आणी देशा बाहेरील लोक येणार आहे. त्यात परिस्थिती अधिक बिघडेल. याचा सारा सार विचार करून राज्यातील अठरा हजार विध्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या जीवाला धोका पोचणार नाही याची जबाबदारी कोणी स्वीकारणार कि मुख्यमंत्री सावंत यांच्यावर दबाव घालून परीक्षा घ्या म्हणून सांगणार असा प्रश्न उगेचे माजी सरपंच आणी समाज सेवक अनिल जांगळे यांनी केला आहे. 

        

संबंधित बातम्या