मडगावात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट

बहुमजली वाहन पार्किंग तळाचं काम गेल्या 7 वर्षापासून रखडलेल्या स्थितीत
Madgaon Traffic Issue
Madgaon Traffic IssueDainik gomantak

मडगाव : मडगावात वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली असून एका नियोजित ठिकाणी दुचाकी किंवा चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी तीन चार वेळा फेऱ्या माऱ्याव्या लागत असल्याचं चित्र आहे. गेल्या 7 वर्षापासून रखडत पडलेल्या बहुमजली वाहन पार्किंग तळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली नसून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनात मात्र बेसुमार वाढ होत आहे. त्यातच मडगाव शहराला वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे मडगावातील वाहन पार्किंगची समस्या सुटणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Madgaon Traffic Issue
गोव्यात ‘कॅच द रेन’वर देणार भर..!

मडगाव पालिका क्षेत्राच्या लोकसंख्येबरोबरच वाहन संख्याही वाढत आहे. याबरोबरच आपसापच्या परिसरातील वाहनेही या शहरात दाखल होत आहेत. वाहने वाढली तरी शहरातील रस्ते तेवढेच राहिल्याने स्वाभाविक पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. वाहने पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने
रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. यामुळे जागा व्यापते आणि वाहतूक कोंडी होते. नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी नियोजित जागा उपलब्ध नसल्याने सर्वत्र रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होऊ लागली आहे.

Madgaon Traffic Issue
कोकण रेल्वे स्थानकाजवळील पदपथावर झुडपे!

मडगाव शहरातील पिंपळकट्टा, गांधी मार्केट, ग्रेस चर्च, मडगाव नगरपालिका, सिने लता थिएटर परिसरात एखादे वाहन पार्क करण्यासाठी बराच वेळ ताटकळत वाट पाहावी लागत आहे . तसेच काही जुन्या वापरात नसलेल्या भंगारातील गाड्या रस्त्याच्या बाजूला कित्येक वर्षे आहे त्याच स्थितीत असल्याने त्यांच्यामुळे ही वाहने पार्क करण्यात अडथळा निर्माण होत आहे .

दरम्यान याबाबत मडगाव नगरपालिकेचे मुख्यधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना विचारलं असता त्यांनी मडगाव मधील मल्टी पार्किंग प्रकल्पासाठी दोन ते तीन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र या प्रकल्पाच्या दराचा ताळमेळ जुळत नसल्याने कोणताही कंत्राटदार पुढे येत नाही. त्यामुळेच हा प्रकल्प रखडला आहे असल्याचं सांगितलं आहे.

मडगाव शहरात दिवसाकाठी अनेक वाहने नो पार्किंगमध्ये लावलेली आढळतात. अशी वाहने पार्क केल्याने त्यांना दंड द्यावा लागतो. मडगाव नगरपालिकेचं नो पार्किंगच्या गाड्या उचलणारे वाहन गेल्या काही दिवसात उपलब्ध नाही नसल्याने कारवाई संथगतीने सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com