गोव्यात उपराष्ट्रपतींचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग बंद

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे गोव्यात ९ ते १६ जानेवारी दरम्यान असतील.​ १६ जानेवारीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुन्हा परतणार असल्याने त्या दिवशीही वाहन पार्किंगला बंदी असेल

पणजी: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे गोव्यात ९ ते १६ जानेवारी दरम्यान असतील. ९ जानेवारीला ते गोव्यात येत असल्याने दाबोळी येथील आयएनएस हंसा ते राजभवन व्हाया बोगमाळो जंक्शन, विमानतळ जंक्शन, चिखली सर्कल, आगशी जंक्शन, जीएमसी जंक्शन, मेरशी जंक्शन, दिवा सर्कल, मिरामार सर्कल, जॅक सिक्वेरा रस्ता ते एनआयओ सर्कल या रस्त्यावर वाहने पार्किंग करण्यास बंदी करण्यात आली आहे.

१६ जानेवारीला ते पुन्हा परतणार असल्याने त्या दिवशीही वाहन पार्किंगला बंदी असेल. त्यांचा वाहनांचा ताफा वाहतूक करणार आहे त्यावेळी काही ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावरील वाहतूक काही तास अगोदर बंद ठेवली जाणार आहे. ९ व १२ जानेवारी या दिवशी उपराष्ट्रपती पर्वरी येथे जाणार असल्याने राजभवन ते ओ कोकेरो सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने पार्किंग करण्यात मनाई करण्यात आली आहेत.

आणखी वाचा:

गोवा दौऱ्याआधी गृहमंत्री अमित शाहांचा होम वर्क -

संबंधित बातम्या