Goa: पारोडा गाव सुसज्ज पंचायत घरापासून वंचित

एकाच खोलीतून चालते कामकाज; छताला गळती; खिडक्यांची दुरावस्था
Goa: पारोडा गाव सुसज्ज पंचायत घरापासून वंचित
Goa: Paroda Panchayat GharDaily Gomantak

सासष्टी: गोव्यात (Goa) दयनीय व अत्यंत खराब स्थितीत असलेल्या सर्व पंचायत घरांना (Panchayat House) नवा चेहरा प्राप्त करून देण्यासाठी गोवा सरकार (Goa Government) पंचायतींना नवीन पंचायत घर उभारण्याचे काम करीत आहे, परंतु पंचायत घराची अत्यंत गरज भासणाऱ्या पारोडा पंचायतीला सुसज्ज पंचायत घरापासून अद्याप वंचित रहावे लागले आहे. पारोडा पंचायत एकाच खोलीतून (only one room) सर्व कामकाज करीत असून गळके छत, पंचायतीत येणारे पाणी (water) तसेच पंचायती घराची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. पारोडा पंचायतीत दोन खोल्या असून एका खोलीत पंचायत व दुसऱ्या खोलीत वीज विभाग चालत आहे. एकच खोली असल्यामुळे जागेची मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत असून पंचायतीची कपाटे ठेवण्यासाठीसुध्दा पंचायतीत जागा उपलब्ध राहिलेली नाही. पारोडा पंचायत घराला (Paroda Panchayat House) अनेक वर्षे झाल्यामुळे या इमारतीची स्थिती अत्यंत बिकट (Dangerous building) बनली असून गळके छत व खिडक्याची दुरावस्था झालेली आहे. सद्यस्थितीत असलेल्या पंचायतीत काम करणे कठीण बनल्याने नागरिकांना योग्य सेवा पुरविण्यासाठी नवीन पंचायत घर उभारण्यासाठी पंच सदस्य प्रयत्न करीत आहे.

Goa: Paroda Panchayat Ghar
Goa Floods: पंतप्रधानांची गोवेकरांना मदतीची ग्वाही

पारोडा प्राथमिक शाळेच्या (Paroda Primary School) वर पंचायत घर उभारण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण खात्याला (Education Department) फाईल पाठविण्यात आली असून आमदार क्लाफास डायस (MLA Clafasio Dias) हे नियमित पाठपुरावा करीत आहेत. पंचायत घराचे बांधकाम (Panchayat Ghar Constraction) लवकर हाती घेण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू असून यासंबंधी शिक्षण खात्याच्या संचालकांकडे चर्चा करण्यात येणार आहे. पंच सदस्य तसेच नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून जागा व साधनसुविधा नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, असे पारोडा पंचायतीचे सरपंच दीपक खरंगटे (Sarpanch Deepak Karangate) यांनी सांगितले. पंचायत घर उभारण्यासाठी जागेची कमतरता भासत असल्यामुळे पारोड्यात बंद पडलेल्या शाळेच्या वर पंचायत घर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळेचा वापर फक्त मतदान केंद्रासाठी करण्यात येत असल्यामुळे तळमजल्यावर (Ground Flower) शाळा व पहिल्या मजल्यावर पंचायत घर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांकडून पंचायत घरांसाठी आश्वासन देण्यात आलेले आहे. पंचायत घर उभारण्यासाठी शिक्षण खात्याकडून परवानगी मिळणे आवश्यक असून शिक्षण खात्याला फाईल पाठविण्यात आली आहे. शिक्षण खात्याकडून परवानगी मिळाल्यावर पंचायत घर उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे, असे कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनी सांगितले.

Goa: Paroda Panchayat Ghar
Goa Floods: सारमानस येथील पूरस्थिती नियंत्रणात; भीती कायम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com