Fire In Goa: पर्रा डोंगरावरील माळरान पेटले

म्हापसा, पिळर्ण तसेच पणजी मुख्यालयांतून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी मागविले होते.
Fire in Mapussa Goa
Fire in Mapussa GoaDainik Gomantak

Fire In Mapusa Goa म्हापसा-आराडी-पर्रा येथील डोंगर माळरानावर मोठी आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिकांकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

ही आग सकाळी 8 वा.च्या सुमारास भडकल्याचे सांगण्यात आले. मात्र, आग नेमकी कशी पसरली हे समजू शकलेले नाही. म्हापसा, पिळर्ण तसेच पणजी मुख्यालयांतून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी मागविले होते.

प्राप्त माहितीनुसार, हडफडे व बादे या बाजूने डोंगरावर लागलेली ही आग पसरत आराडी-पर्रा येथील टेकडीवर पोहोचली. या आगीत मोठ्या प्रमाणात काजू तसेच इतर झाडे जळाली.

माळरानावरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक माडाच्या झावळ्या घेऊन प्रयत्न करताना दिसले. शक्य तिथे पाईप जोडून पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.

सुक्या गवतामुळे हानी

आराडी येथील पर्रा कोमुनिदादच्या टेकडीला ही आग लागली. या ठिकाणी सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्षारोपण केले गेले आहे.

मात्र, मागील काही वर्षांपासून या डोंगरावरील गवत कापले जात नसल्याने ही आग पसरत गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुक्या गवतामुळे आगीने जास्त पेट घेतला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला जास्त संघर्ष करावा लागत होता.

Fire in Mapussa Goa
Colva: गेस्ट हाऊसमध्ये चालवायचे सेक्स रॅकेट; पती-पत्नीसह महाराष्ट्रातील एकाला अटक

सहा ठिकाणी गवताला आग

मडगाव व सासष्टी परिसरात एकंदरीत सहा ठिकाणी गवताला आग लागण्याची प्रकरणे घडली आहेत, अशी माहिती मडगाव अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी गिल सौझा यांनी दिली.

मडगाव येथील कोंब, आके येथील कोस्ता फॅक्टरी, गुजराथी समाज हॉल, दुर्गा पेट्रोल पंप फातोर्डा, राय, वेर्णासहित इतर ठिकाणी आग लागण्याची प्रकरणे घडली आहेत. सर्व ठिकाणी आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले असल्याची माहितीही सौझा यांनी दिली.

Fire in Mapussa Goa
Mopa Airport: मोपा’वरील नोकऱ्यांत गोमंतकीयांना प्राधान्य न दिल्यास छेडणार आंदोलन’

कुठ्ठाळी येथील चर्च स्ट्रीट डोंगरमाथ्यावर भडका

कुठ्ठाळी येथील चर्च स्ट्रीट डोंगरमाथ्यावर आग लागल्याने आगीचे लोण अजूनही धुमसत असून वेर्णा येथील अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

आग मंगळवारी रात्री लागली असल्याने स्थानिक पंच फ्रान्सिस फर्नांडिस यांनी कुठ्ठाळीचे आमदार आंतानियो वाझ यांना कळवताच त्यांनी वेर्णा पोलिस व अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत होते; कारण तेथे जाण्यासाठी योग्य असा मार्ग मिळत नव्हता. याची जाणीव होताच अग्निशमन दलाने नौदलाला पाचारण केले. नौदलाने चार-पाच वेळा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात प्रयत्न केला.

Fire in Mapussa Goa
Goa Crime: नुरानी दरोडा - संशयिताला तब्बल 20 वर्षांनंतर अटक

अग्निशामकला घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी

अग्निशमन दलाकडून तसेच नौदलाकडून आग विझविण्याचे अथक परिश्रम चालू आहेत. दाट झाडी असल्यामुळे अग्निशमनचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्यामुळे बुधवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारले जात आहे. बुधवारी दुपारी अग्निशमन दलाच्या मदतीसाठी एका व्यवस्थापनाने आपले ५० कामगार दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com