जनमन उत्सव सर्वेक्षणात चिखली-वास्कोतील महिलांचा सहभाग

मये, वाळपई, प्रियोळ, मांद्रे, पेडणेत भेटीगाठी
जनमन उत्सव सर्वेक्षणात चिखली-वास्कोतील महिलांचा सहभाग
जनमन उत्सवDainik Gomantak

महिलांच्या आकांक्षांना एक वेगळा परिघ मिळवून देण्यासाठी दै. ‘गोमन्तक’ने खास महिलांसाठी हाती घेतलेल्या जनमन उत्सव सर्वेक्षणात चिखली-वास्को येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. राज्यातील एका नव्या सुरवातीच्या त्या या उपक्रमातून वाटेकरी झाल्या.

शुक्रवारी चिखली येथील साई सर्व्हिस सेंटरजवळ असलेल्या महिला मंडळातील महिलांनी या उपक्रमात भाग घेत आपली मते नोंदविली. या सर्वेक्षणाबद्दल त्यांच्या मनात कुतूहल होते हेही यावेळी दिसून आले. त्यांच्या मनातील शंकांचे ‘गोमन्तक’च्या टीमने निरसन केले.

चिखली येथील शिव महिला मंडळ व ओम दिव्य महिला मंडळातील महिलाही या उपक्रमात उमेदीने सहभागी झालेल्या दिसल्या. या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. मडगावात आज झरीवाडा-दवर्ली, रुमडामळ, मारुती मंदिर आके येथील महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपली मते नोंदविली. ‘गोमन्तक’ने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. केपे भागात इग्रामळ, कपेलाभाट, आंबावली येथील महिला गट या उपक्रमात सामील झाले होते.

जनमन उत्सव
जनमन उत्सवDainik Gomantak

चिखलीच्या महिला गटांचा सहभाग

येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील दै. ‘गोमन्तक’च्या ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षण सध्या उत्तर गोव्यातील मये, वाळपई, प्रियोळ, मांद्रे व पेडणे मतदारसंघात सुरू आहे. त्यानिमित्ताने जनमानसाचा मतप्रवाह जाणून घेण्याच्या उद्देशाने तेथील महिलांच्या भेटीगाठी घेऊन अत्याधुनिक संगणकीकरणाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने माहितीचे संकलन केले जात आहे.

जनमन उत्सव
जनमन उत्सवDainik Gomantak

आतापर्यंत मये मतदारसंघातील शिरगाव, पैरा व मये ही गावे, वाळपई मतदारसंघातील मासोर्डे गाव व वाळपई पालिका क्षेत्र, प्रियोळ मतदारसंघातील वरगाव भागात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मांद्रे मतदारसंघातील केरी व पालये आणि पेडणे मतदारसंघातील कोरगाव, वझरी व विर्नोडा भागात विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी काही भागांतील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, अन्य गावांत अजूनही सर्वेक्षण सुरू आहे. हे विस्तृत सर्वेक्षण असल्याने या मतदारसंघांतील अन्य गावांत सर्वेक्षण होणे बाकी आहे. या सर्वेक्षणाचे काम करणारे स्वयंसेवक राजकीय परिस्थितीबाबत महिलांची मते जाणून घेतआहेत.

यानिमित्ताने स्वयंसेवक त्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी स्नेहसंवाद साधत आहेत. दै. ‘गोमन्तक’च्या प्रति असलेला वाचकांचा प्रेमादर, आत्मीयता व जिव्हाळा यामुळे ठिकठिकाणच्या महिला या सर्वेक्षणाला उत्साहपूर्वक प्रतिसाद देत आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे याबाबत स्वयंसेवकांना यथोचित सहकार्यही मिळत आहे.

Related Stories

No stories found.