फोंडा चौपदरी रस्त्यांवर पार्ट्यांना ऊत!

रात्रीस खेळ चाले : पाऊस असल्यास उड्डाण पुलाखाली, अन्यथा रस्त्यावर धिंगाणा सुरू
फोंडा चौपदरी रस्त्यांवर पार्ट्यांना ऊत!
Parties Roadside in Ponda Dainik Gomantak

फोंडा : फोंड्यातील चौपदरी रस्त्यांवर रात्रीच्या वेळी पार्ट्या चालतात. पोलिसांची नजर चुकवून रात्रभर धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेने कडक पावले उचलण्याची मागणी फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे. चौपदरी रस्त्यांच्या उड्डाण पुलाखाली, ढवळी, फर्मागुढी, कुर्टी तसेच खांडेपार येथील नवीन पुलावरही रात्रीच्यावेळी पार्ट्या रंगत आहेत. यावर आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

फोंडा शहराला मध्यवर्ती ठेवून तिन्ही बाजूंनी चौपदरी रस्त्याची उभारणी करण्यात आली आहे. या रस्त्यांची उभारणी करताना फोंडा शहरातील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊनच ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे फोंडा शहरावरील ताण बऱ्याच अंशी कमी झाला. सध्या या रस्त्यांवर वाहतूक सुरू असली तरी पावसात उड्डाण पुलांच्या खाली तर पाऊस नसल्यावर चौपदरी रस्त्याच्या कडेला पार्ट्या केल्या जात आहेत.

Parties Roadside in Ponda
राज्यात पुढील 3-4 तासांत पावसाची जोरदार हजेरी; हवामान खात्याचा अंदाज

रात्रीच्या वेळी मोठमोठ्याने बोलणे, हसणे असे प्रकार चालतात. चार दिवसांपूर्वी कुर्टी जुन्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीत मलनिस्सारण प्रकल्पाच्या रबरी पाईप्सना आग लागली. त्यात अर्धे पाईप्स जळाले. मात्र या पाईप्सवरही बसून रात्रीच्या पार्ट्या रंगत होत्या. या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच गुटखा पाकिटे आदी साहित्य सापडले आहे. सद्यस्थितीत फोंडा पोलिसांनी या चौपदरी रस्त्यांवर रात्रीच्या वेळी गस्त घालून अशाप्रकारे धिंगाणा घालणाऱ्यांना आवर घालण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com