गोवा भाजप नेते तथा कार्यकर्त्यांच्या घरावर फडकले पक्षाचे झेंडे

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज भाजप नेते तथा कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांवर पक्षाचे झेंडे फडकावलेले आहेत.

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज भाजप नेते तथा कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांवर पक्षाचे झेंडे फडकावलेले आहेत. आजपासून भाजपने सेवा सप्ताह सुरू केला असून मास्क वितरण, जागांचे निर्जंतुकीकरण, कोविडविषयी जनजागृती असे उपक्रम यांतर्गत हाती घेण्यात आले आहेत. (Party flags hoisted at the homes of Goa BJP leaders and party Workers)

Margao Municipal Corporation elections : 32 उमेदवारांकडून अर्ज दाखल 

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Tanavade) यांनी थिवी येथील तर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी साखळी येथील निवासस्थानी पक्षाचा झेंडा फडकावला आहे. दुपारी राज्यात १९ ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांचे भाषण पाहण्याची ऐकण्याची सोय करण्यात आली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री साखळी येथील भाजप कार्यालयात तर तानावडे पणजीच्या भाजप मुख्यालयात उपस्थित राहतील. सेवा सप्ताह आयोजन समितीचे अध्यक्षपद आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या